COVID19 : देशात करोनाचा कहर सुरूच; दैनंदिन रुग्णसंख्येने पावणे दोन लाखांचा टप्पा ओलांडला

COVID19 : देशात करोनाचा कहर सुरूच; दैनंदिन रुग्णसंख्येने पावणे दोन लाखांचा टप्पा ओलांडला

दिल्ली | Delhi

देशात करोनाच्या (COVID19 India) रुग्णांची संख्या आता प्रचंड वेगाने वाढत आहे. गेल्या २४ तासांत देशात करोनाच्या नवीन रुग्णांच्या संख्येने पावणे दोन लाखांचा टप्पा ओलांडला आहे.

देशात गेल्या २४ तासांत १ लाख ७९ हजार ७२३ इतके नवीन रुग्ण (new corona patient) आढळून आले आहेत. करोना रुग्णांचा पॉझिटिव्हीटी दर (Cronavirus Positivity rate) हा वाढून १० टक्क्यांवर गेला आहे.

सध्या देशात सक्रिय रुग्णांची संख्या ७ लाख २३ हजार ६१९ आहे (covid active patient). तर आतापर्यंत ३ कोटी ४५ लाख १७२ जणांनी करोनावर मात केली आहे. गेल्या दोन वर्षात ४ लाख ८३ हजार ९३६ लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

देशात ओमिक्रॉनच्या (omicron india) रुग्णांची संख्याही वाढत आहे. देशातील २७ राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांमध्ये ओमिक्रॉनचे रुग्ण आढळून आले आहेत. देशातील ओमिक्रॉनच्या एकूण रुग्णांची संख्या ही ४ हजार ०३३ इतकी झाली आहे. त्यापैकी १ हजार ५५२ जण बरे झाले आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com