Good News : ‘कोव्हॅक्सीन’ लस ‘डबल म्युटंट’ करोनाविरोधात प्रभावी - आयसीएमआर

Good News : ‘कोव्हॅक्सीन’ लस ‘डबल म्युटंट’ करोनाविरोधात प्रभावी - आयसीएमआर

नवी दिल्ली -

हैद्राबादच्या भारत बायोटेकने तयार केलेली ‘कोव्हॅक्सीन’ ही करोना प्रतिबंधक लस ‘डबल म्युटंट’ करोनाविरोधात प्रभावी असल्याचे इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) म्हटले आहे.

या करोना प्रतिबंधक लशीच्या तिसर्‍या टप्प्यातील क्लिनिकल चाचणीचा अहवाल प्राप्त झाला आहे. यामध्ये लस किती प्रभावी आहे हे सांगण्यात आलं आहे. या लशीचा सरासरी प्रभाव 78 टक्के असून लक्षणे नसलेल्या रुग्णांवर ही लस 70 टक्के प्रभावी आहे. तर गंभीर करोना रुग्णांवर ही लस 100 टक्के प्रभावी आहे. या लशीमुळे करोना रुग्णांचे रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण कमी होऊ शकतं.

दरम्यान, देशातील लसीकरण मोहिमेला अधिक वेग देण्यासाठी भारत बायोटेक पुढच्या महिन्यात कोव्हॅक्सिनच्या तीन कोटी डोसची निर्मिती करणार असून वर्षाला 70 कोटी डोसची निर्मिती करणार असल्याचं भारत बायोटेकचे प्रमुख कृष्णा एल्ला यांनी सांगितले आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com