बापरे! भारतात गेल्या २४ तासात १.८४ लाख नव्या रुग्णांची नोंद

तर १ हजारापेक्षा जास्त मृत्यू
बापरे! भारतात गेल्या २४ तासात १.८४ लाख नव्या रुग्णांची नोंद

दिल्ली | Delhi

करोनाचा उद्रेक दिवसागणिक वाढताना दिसून येत आहे. देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेनं जेरीस आणलं असून, प्रचंड वेगानं संक्रमण होत आहे. दररोज मोठ्या संख्येने नवीन करोनाबाधित सापडत आहे. देशात गेल्या २४ तासात करोना रुग्णवाढीचा आतापर्यंतचा उच्चांक नोंदवला गेला आहे.

देशात करोनाचा शिरकाव झाल्यापासूनची ही उच्चांकी रुग्णवाढ असून, करोनामुळे मृत्यू होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेली आकडेवारी सरकार आणि आरोग्य व्यवस्थेची झोप उडवणारी आहे.

Title Name
'रेमडेसिवीर'बाबत WHO चा मोठा दावा!
बापरे! भारतात गेल्या २४ तासात १.८४ लाख नव्या रुग्णांची नोंद

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासात देशात तब्बल १ लाख ८४ हजार ३७२ नव्या करोना रुग्णांची नोंद झाली आहे. देशातील एकूण रुग्ण संख्या १ कोटी ३८ लाख ७३ हजार ८२५ इतकी झाली आहे.

तसेच गेल्या २४ तासात ८२ हजार ३३९ जण उपचारानंतर बरे झाले असून १०२७ जणांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत १ कोटी २३ लाख ३६ हजार ०३६ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. देशात सक्रिय रुग्नांची संख्या १३ लाख ६५ हजार ७०४ इतकी झाली असून मृतांची संख्या १ लाख ७२ हजार ०८५ इतकी झाली आहे.

Title Name
जगभरातील सर्व लसी भारतात मिळणार
बापरे! भारतात गेल्या २४ तासात १.८४ लाख नव्या रुग्णांची नोंद

महाराष्ट्रातील स्थिती काय?

महाराष्ट्रातील करोनाबाधित रुग्णांची संख्या अत्यंत झपाट्याने वाढत आहे. दररोज मोठ्या संख्येनं रुग्ण आढळून येत असून, रूग्णांच्या मृत्यूच्या संख्येतही भरच पडत आहे. मंगळवारी करोनाबाधितांच्या संख्येनं आजपर्यंतचा उच्चांक गाठल्याचं दिसून आलं. दिवसभरात राज्यात तब्बल ६० हजार २१२ करोनाबाधित वाढले असून, २८१ रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर १.६६ टक्के एवढा आहे. राज्यात सध्या ५ लाख ९३ हजार ०४२ रुग्ण उपचार घेत आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com