Corona Update : देशातील दैनंदिन रुग्णसंख्या ३० हजारांच्या आत मात्र एकट्या केरळात ६० टक्के

महाराष्ट्रातील स्थिती काय?
Corona Update : देशातील दैनंदिन रुग्णसंख्या ३० हजारांच्या आत मात्र एकट्या केरळात ६० टक्के

दिल्ली | Delhi

भारतात करोनाच्या दुसऱ्या लाटेना (Corona second wave) देशात हाहाकार माजवला होता. करोना रुग्णसंख्येने (Covid19 Patient) मोठा उच्चांक गाठला होता. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून देशात करोनाच्या (COVID19) आकडेवारीत चढ-उतार दिसत आहे. यामुळे करोनाचे संकट (Coronavirus crisis) अद्याप देशभर कायम आहे.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासात देशात करोनाचे (New corona patient today) २९ हजार ६१६ नवे रुग्ण आढळले आहेत. तर २९० जणांचा करोनामुळे मृत्यू (COVID19 death) झाला आहे. आतापर्यंत देशात एकूण ३ कोटी ३६ लाख २४ हजार ४१९ जणांना करोनाची लागण (Corona total patient) झाली आहे. तसेच देशात सध्या ३ लाख १ हजार ४४२ सक्रीय रुग्ण (Corona active cases) आहेत. तर ३ कोटी २८ लाख ७६ हजार ३१९ जणांनी आतापर्यंत करोनावर मात केली आहे. तर करोनामुळे ४ लाख ४६ हजार ६५८ जणांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान केरळमध्ये करोनाचा प्रादुर्भाव (Kerala Corona Update) कमी होताना दिसत नाही. गेल्या २४ तासात वाढलेल्या रुग्णसंख्येमध्ये सर्वाधिक रुग्णसंख्येची नोंद ही केरळमध्ये झाली आहे. देशात गेल्या २४ तासात आढळलेल्या एकूण करोनाग्रस्तांपैकी एकट्या केरळमध्ये काल १७ हजार ९८३ रुग्ण सापडले, तर २९० करोना बळींपैकी केरळात १२७ कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. (New covid19 patient in keral)

देशात सुरु असलेल्या लसीकरणाने (corona vaccination in india) आता वेग पकडायला सुरुवात केली आहे. शुक्रवारी दिवसभरात एकूण ७१ कोटी ४ लाख ०५१ लसीचे डोस देण्यात आले आहेत. त्यामुळे आत्तापर्यंत देण्यात आलेल्या डोसची संख्या ८४ कोटी ८९ लाख २९ हजार १६० इतकी झाली आहे.

महाराष्ट्रातील स्थिती? (Corona update maharashtra)

राज्यात शुक्रवारी ३ हजार २८६ नवीन करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर ३ हजार ९३३ रुग्ण करोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत ६३ लाख ५७ हजार ०१२ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.२३ टक्के आहे. राज्यात काल ५१ करोना बाधितांचे मृत्यू झाले असून सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के एवढा आहे.

Related Stories

No stories found.