Corona Update : देशातील दैनंदिन रुग्णसंख्या ३० हजारांच्या आत मात्र केरळात चिंता कायम

Corona Update : देशातील दैनंदिन रुग्णसंख्या ३० हजारांच्या आत मात्र केरळात चिंता कायम

दिल्ली | Delhi

गेल्या काही दिवसांपासून देशात सुरू असलेला करोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव काहीसा ओसरताना दिसत आहे. करोना रुग्णसंख्येत आणि मृतांच्या संख्येतही गेल्या काही दिवसांपासून चढउतार दिसून येत आहे. गेल्या २४ तासांत देशात करोना बाधितांच्या संख्येत मोठा दिलासा मिळाला आहे. (Corona update india)

आरोग्य मंत्रालयाने (Ministry of Health) दिलेल्या माहितीनुसार देशात गेल्या २४ तासांत देशामध्ये २८ हजार ५९१ नव्या करोनाबाधितांची नोंद झाली. त्यामुळे आता उपचाराधीन करोना रुग्णांची संख्या ३ लाख ८४ हजार ९२१ झाली आहे. तर देशातील एकूण रुग्णांची संख्या ३ कोटी ३२ लाख ३६ हजार ९२१ इतकी झाली आहे.

तसेच गेल्या २४ तासात ३४ हजार ४८४ जणांनी करोनावर मात केली असून ३३८ जणांचा मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत ३ कोटी २४ लाख ०९ हजार ३४५ जणांनी करोनावर मात केली असून ४ लाख ४२ हजार ६५५ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.

दरम्यान केरळमध्ये करोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत नाही. गेल्या २४ तासात वाढलेल्या रुग्णसंख्येमध्ये सर्वाधिक रुग्णसंख्येची नोंद ही केरळमध्ये झाली आहे. देशात गेल्या २४ तासात आढळलेल्या एकूण करोनाग्रस्तांपैकी एकट्या केरळमध्ये काल २० हजार ४८७ रुग्ण सापडले, तर ३३८ करोना बळींपैकी केरळात १८१ कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com