
दिल्ली | Delhi
देशात करोनाबाधितांचा (Coronavirus) दैनंदिन आकडा दिवसागणिक वाढतच आहे. आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत ६ हजार ०५० नव्या करोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.
दरम्यान, गेल्या चार दिवसांत करोनाच्या नवीन रुग्णांमध्ये १०० टक्के वाढ झाली आहे. देशातील सक्रिय करोना रुग्णांची संख्या आता २८ हजार ३०३ झाली आहे. गुरुवारी देशात एकूण २५ हजार ५८७ सक्रिय रुग्ण होते. सक्रिय प्रकरणं सध्या एकूण प्रकरणांपैकी ०.०६ टक्के आहेत.
तसेच गेल्या २४ तासात देशात करोनामुळे १४ जणांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात तीन, कर्नाटक आणि राजस्थानमधील प्रत्येकी दोन, दिल्ली, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर आणि पंजाबमधील प्रत्येकी एक आणि केरळमधील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
यासह करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ५ लाख ३० हजार ९४३ वर पोहोचली आहे. करोना रुग्णसंख्या वाढत असल्याने आरोग्य मंत्रालयाने याआधीच गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे जर रुग्णसंख्या अशीच वाढत राहिली तर मास्कसक्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
गुरुवारी महाराष्ट्रात ८०३ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तसंच राज्यात ३ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यदूर १.८२ टक्के इतका आहे. मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी करोनामुळे एकाचा मृत्यू झाला आहे.
बुधवारी करोनामुळे एकाचा झाला होता मृत्यू झाला आहे. दरम्यान मुंबईत गुरुवारी २१६ कोरोना रुग्णांची नोंद झाली असून मुंबईत सध्या १ हजार २६८ रुग करोनाबाधित आहेत.