Coronavirus : देशातील एकूण रुग्णांची संख्या एक कोटी ५० लाखांवर

Coronavirus : देशातील एकूण रुग्णांची संख्या एक कोटी ५० लाखांवर

दिल्ली | Delhi

करोनाचा भारतातील कहर कमी होताना दिसत नाही. करोना रुग्णांच्या संख्येत मोठी भर पडताना दिसत आहे. देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेनं जेरीस आणलं असून, प्रचंड वेगानं संक्रमण होत आहे. विशेष म्हणजे, करोनाच्या दुसऱ्या लाटेत लहानग्या रुग्णांचाही समावेश आहे.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासात देशात तब्बल २ लाख ७३ हजार ८१० नव्या करोना रुग्णांची नोंद झाली आहे. देशातील एकूण रुग्ण संख्या १ कोटी ५० लाख ६१ हजार ९१९ इतकी झाली आहे.

तसेच गेल्या २४ तासात १ लाख ४४ हजार १७८ जण उपचारानंतर बरे झाले असून १ हजार ६१९ जणांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत १ कोटी २९ लाख ५३ हजार ८२१ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत.

देशात सक्रिय रुग्नांची संख्या १९ लाख २९ हजार ३२९ इतकी झाली असून मृतांची संख्या १ लाख ७८ हजार ७६९ इतकी झाली आहे. तसेच देशात आतापर्यंत १२ कोटी ३८ लाख ५२ हजार ५६६ जणांचं लसीकरण करण्यात आलं आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com