COVID19 : भारतात सक्रिय रुग्ण पाच लाखांच्या खाली, मात्र मृतांमध्ये वाढ

COVID19 : भारतात सक्रिय रुग्ण पाच लाखांच्या खाली, मात्र मृतांमध्ये वाढ

महाराष्ट्रातील स्थिती काय?

दिल्ली | Delhi

देशात गेल्या तीन ते चार महिन्यापासून करोनाच्या दुसऱ्या लाटेने (Corona Second Wave) अक्षरशः हाहाकार माजलेला पाहायला मिळत होता. वाढती रुग्णसंख्या हा चिंतेचा विषय बनला असतानाच हळूहळू देशातील रुग्णसंख्या आटोक्यात येत असल्याचं दिलासादायक चित्र पाहायला मिळत आहे.

मात्र करोनाचा कहर अद्याप सुरुच आहे. गेल्या २४ तासांत देशभरात तब्बल आठशेहून अधिक करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. काही दिवसांपूर्वी ही आकडेवारी पाचशेपेक्षा ही कमी होती. मात्र अचानक मृत्यूंमध्ये वाढ झाल्याने चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे.

COVID19 : भारतात सक्रिय रुग्ण पाच लाखांच्या खाली, मात्र मृतांमध्ये वाढ
केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारावर संजय राऊत यांची खोचक प्रतिक्रिया, म्हणाले...

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या २४ तासांत ४५ हजार ८९२ नवे करोना रुग्ण (New Covid19 Patient) आढळले असून ८१७ रुग्णांचा (Covid19 death) उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. देशातील एकूण करोना रुग्णसंख्या ३ कोटी ०७ लाख ०९ हजार ५५७ इतकी झाली आहे. तर आतापर्यंत करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ४ लाख ६० हजार ७०४ वर पोहोचली आहे. तसेच देशात गेल्या २४ तासात ४४ हजार २९१ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. या संख्येसह करोनावर मात करणाऱ्यांची संख्या २ कोटी ९८ लाख ४३ हजार ८२५ वर पोहचली आहे.

दरम्यान, देशात सुरु असलेल्या लसीकरण मोहिमेदरम्यान आतापर्यंत एकूण ३६ कोटी ४८ लाख ४७ हजार ५४९ लसीचे डोस देण्यात आले आहेत. यातील ३३ लाख ८१ हजार ६७१ लसीचे डोस बुधवारी एका दिवसात देण्यात आले. (corona vaccination update)

COVID19 : भारतात सक्रिय रुग्ण पाच लाखांच्या खाली, मात्र मृतांमध्ये वाढ
Modi New Cabinet : डॉ.भारती पवार, रावसाहेब दानवे यांनी स्वीकारला पदभार, पाहा फोटो

महाराष्ट्रातील स्थिती काय? (Maharashtra corona update)

बुधवारी महाराष्ट्रात ९ हजार ५५८ नवे करोना बाधित आढळून आले आहेत तर १४७ रुग्णांचा मृत्यू झाला. एकूण बाधितांची संख्या ६१ लाख २२ हजार ८९३ वर पोहोचली आहे तर आतापर्यंत एकूण १ लाख २३ हजार ८५७ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात सध्या १ लाख १४ हजार ६२५ रूग्ण उपचार घेत आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com