Covid19 : भारतात दैनंदिन रुग्णसंख्येत घट, मात्र १२०० हून अधिक जणांचा मृत्यू

देशातले ५३ टक्के रुग्ण महाराष्ट्र आणि केरळमध्ये
Covid19 : भारतात दैनंदिन रुग्णसंख्येत घट, मात्र १२०० हून अधिक जणांचा मृत्यू

दिल्ली | Delhi

देशात गेल्या तीन ते चार महिन्यापासून करोनाच्या दुसऱ्या लाटेने (Corona Second Wave) अक्षरशः हाहाकार माजलेला पाहायला मिळत होता.

वाढती रुग्णसंख्या हा चिंतेचा विषय बनला असतानाच हळूहळू देशातील रुग्णसंख्या आटोक्यात येत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. मात्र दररोज समोर येणारी करोनाबाधितांची संख्या ही कधी करोनामुक्त झालेल्यांपेक्षा जास्त तर कधी कमी आढळून येत आहे. तर, रूग्णांच्या मृत्यू संख्येत वाढ सुरूच आहे.

Covid19 : भारतात दैनंदिन रुग्णसंख्येत घट, मात्र १२०० हून अधिक जणांचा मृत्यू
Petrol Disel Price : पेट्रोल-डिझेलचे दर आज पुन्हा वाढले, जाणून घ्या आजचे दर

बुधवार आणि गुरुवारपेक्षा शुक्रवारी नवीन करोना रुग्णसंख्येत घट पाहायला मिळाली आहे. मात्र मृताच्या संख्येत मात्र मोठी वाढ झाली आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या २४ तासांत ४२ हजार ७६६ नवे करोना रुग्ण (New Covid19 Patient) आढळले असून १ हजार २०६ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. देशातील एकूण करोना रुग्णसंख्या ३ कोटी ०७ लाख ९५ हजार ७१६ इतकी झाली आहे.

तर आतापर्यंत करोनामुळे मृत्यू (Covid19 death) झालेल्यांची संख्या ४ लाख ०७ हजार १४५ वर पोहोचली आहे. तसेच देशात गेल्या २४ तासात ४५ हजार २५४ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. या संख्येसह करोनावर मात करणाऱ्यांची संख्या २ कोटी ९९ लाख ३३ हजार ५३८ वर पोहचली आहे. तसेच देशात सध्या ४ लाख ०७ हजार १४५ रुग्णांवर उपचार आहेत.

दरम्यान महाराष्ट्र (Maharashtra) आणि केरळ (Kerala) या दोन राज्यांमध्ये देशातील निम्म्याहून अधिक करोना रुग्ण आहेत, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी सांगितले आहे. केरळातील १४ आणि महाराष्ट्रातील १५ जिल्ह्यांमध्ये चिंताजनक परिस्थिती आहे असेही आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. गेल्या आठवड्यातील आकडेवारीच्या आधारे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने हि माहिती दिली आहे.

आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव्ह अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले, करोनाची दुसरी लाट अद्याप संपलेली नाही. हा विषाणू अजूनही आहे. अशा परिस्थितीत, आपण निष्काळजीपणाने करोना प्रोटोकॉलचे उल्लंघन करणे धोकादायक ठरणार आहे. गेल्या आठवड्यात भारतात आढळून आलेल्या करोनाबाधितांपैकी निम्म्याहून अधिक म्हणजेच ५३ टक्के बाधित हे महाराष्ट्र आणि केरळमध्ये आढळले आहेत. करोनाचे संकट अद्याप टळलेले नाही. देश अजूनही दुसर्‍या लाटेसोबत लढत आहे आणि आपल्याला आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे, कारण आपल्याला वाटत आहेत की कोविड-19 संपला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com