Cornavirus : देशात ३.४६ नव्या रुग्णांची नोंद, तर दोन लाखांहून अधिक करोनामुक्त

Cornavirus : देशात ३.४६ नव्या रुग्णांची नोंद, तर दोन लाखांहून अधिक करोनामुक्त

सर्वाधिक प्रभावित १० शहरांपैकी पाच शहरे महाराष्ट्रातील

दिल्ली | Delhi

देशातील करोना स्थिती दिवसेंदिवस अतिशय विदारक होत चालली असून वाढत्या रुग्णांसह मृतांचा आकडाही दररोज मोठ्या संख्येनं वाढत आहे.

देशात सलग तिसऱ्या दिवशी तीन लाखांहून अधिक करोना रुग्ण आढळले आहेत. शुक्रवारी एकाच दिवसात ३.४६ नवीन रुग्णांची नोंद करण्यात आलीय तर दिलासादायक बाब म्हणजे एका दिवसात २ लाखांहून अधिक रुग्ण करोनमुक्त होऊन घरी परतले आहेत.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासात देशात तब्बल ३ लाख ४६ हजार ७८६ नव्या करोना रुग्णांची नोंद झाली आहे. देशातील एकूण रुग्ण संख्या १ कोटी ६६ लाख १० हजार ४८१ इतकी झाली आहे.

तसेच गेल्या २४ तासात २ लाख १९ हजार ८३८ जण उपचारानंतर बरे झाले असून २ हजार ६२४ जणांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत १ कोटी ३८ लाख ६७ हजार ९९७ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत.

देशात सक्रिय रुग्नांची संख्या २५ लाख ५२ हजार ९४० इतकी झाली असून मृतांची संख्या १ लाख ८९ हजार ५४४ इतकी झाली आहे. तसेच देशात आतापर्यंत १३ कोटी ८३ लाख ७९ हजार ८३२ जणांचं लसीकरण करण्यात आलं आहे.

महाराष्ट्रातील स्थिती काय?

महाराष्ट्रात शुक्रवारची चांगली बातमी म्हणजे, एकाच दिवसात राज्यात ७४ हजार ४५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आतापर्यंत ३४ लाख ४ हजार ७९२ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. तर शुक्रवारी राज्यात नव्या ६६ हजार ८३६ रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात २४ तासांत ७७३ रुग्णांचा मृत्यू झाला असून हा मृत्यूदर १.५२ टक्के एवढा आहे. राज्यात आत्तापर्यंत एकूण ४१ लाख ६१ हजार ६७६ रुग्णांची नोंद झाली आहे. तर एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ६ लाख ९१ हजार ८५१ इतकी झाली आहे.

दरम्यान, मुंबई आणि दिल्लीमध्ये करोनाचा कहर माजला आहे. परंतु, आता बंगळुरूमध्येही प्रचंड करोना रुग्ण दिसून आली. देशातील इतर शहराच्या तुलनेत बंगळुरुमध्ये सर्वाधिक १.५ लाख सक्रिय रुग्ण आहेत. तर पुण्यात सक्रिय रुग्णांची संख्या १.२ लाख आहे. सर्वाधिक प्रभावित १० शहरांपैकी पाच शहरे महाराष्ट्रातील आहेत. यात पुणे, मुंबई, नागपूर, ठाणे आणि नाशिक शहरांचा समावेश आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com