COVID19 : देशात रुग्णसंख्येसोबतच मृतांच्या संख्येतही वाढ, 'या' देशात भारतीय विमानांना No Entry

उपचार सुरु असणाऱ्या रुग्णांची संख्या २० लाखांच्या पुढे
COVID19 : देशात रुग्णसंख्येसोबतच मृतांच्या संख्येतही वाढ, 'या' देशात भारतीय विमानांना No Entry

दिल्ली l Delhi

करोनाचा भारतातील कहर कमी होताना दिसत नाही. करोनाच्या दुसऱ्या लाटेनं जेरीस आणलं असून, प्रचंड वेगानं संक्रमण होत आहे. देशातील करोनाबाधितांच्या संख्येसोबतच करोनामुळे मृत्यु होणाऱ्यांची संख्या देखील वाढू लागली आहे.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासात देशात तब्बल २ लाख ५९ हजार १७० नव्या करोना रुग्णांची नोंद झाली आहे. देशातील एकूण रुग्ण संख्या १ कोटी ५३ लाख २१ हजार ०८९ इतकी झाली आहे.

तसेच गेल्या २४ तासात १ लाख ५४ हजार ७६१ जण उपचारानंतर बरे झाले असून १ हजार ७६१ जणांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत १ कोटी ३१ लाख ०८ हजार ५८२ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत.

देशात सक्रिय रुग्नांची संख्या २० लाख ३१ हजार ९७७ इतकी झाली असून मृतांची संख्या १ लाख ८० हजार ५३० इतकी झाली आहे. तसेच देशात आतापर्यंत १२ कोटी ७१ लाख २९ हजार ११३ जणांचं लसीकरण करण्यात आलं आहे.

दरम्यान, नवी दिल्लीहून हाँगकाँगला जाणाऱ्या विमानात ४९ प्रवाशांना करोनाचा संसर्ग झाल्याचे समजल्यानंतर हाँगकाँगने भारतातून येणारी सर्व उड्डाणे थांबविली आहेत. ४ एप्रिल रोजी संक्रमित असलेले सर्व प्रवासी विस्ताराच्या विमानाने हाँगकाँगला गेले होते. या विमानातील ४९ लोक करोना संक्रमित झाले आहेत. विशेष म्हणजे हाँगकाँगमध्ये दररोजच्या करोना संसर्गाच्या घटनांची संख्या यापेक्षा कमी आहे.

यावर्षी जानेवारीमध्ये हाँगकाँगने करोना विषाणूच्या चौथ्या लाटेवर मात केली. हाँगकाँग प्रशासनाने भारत, पाकिस्तान आणि फिलिपिन्सच्या सर्व उड्डाणांवर सोमवारपासून पुढील दोन आठवड्यांसाठी बंदी घातली आहे. प्रशासनाने या देशांना ‘अत्याधिक जोखिम’ या यादीमध्ये टाकले आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com