Corona Update : गणेश चतुर्थीच्या दिवशी पॉझिटिव्ह बातमी…

Corona Update : गणेश चतुर्थीच्या दिवशी पॉझिटिव्ह बातमी…

महाराष्ट्रातील स्थिती काय?

दिल्ली | Delhi

देशातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत चढ-उतार जरी दिसत असला तरी अद्याप कोरोनाच्या संकटाचे ढग कायम आहेत. गेल्या काही दिवासांपासून देशातील रुग्णसंख्या ही ३० ते ४० हजारांच्या दरम्यान वाढत आहे. दरम्यान भारतात गेल्या २४ तासात नव्या करोना रुग्णांमध्ये घट झाल्याचं दिसून आलं.

आरोग्य मंत्रालयाने (Ministry of Health) दिलेल्या माहितीनुसार देशात गेल्या २४ तासांत देशामध्ये ३४ हजार ९७३ नव्या करोनाबाधितांची नोंद झाली. त्यामुळे आता उपचाराधीन करोना रुग्णांची संख्या ३ लाख ९० हजार ६४६ झाली आहे. तर देशातील एकूण रुग्णांची संख्या ३ कोटी ३१ लाख ७४ हजार ९५४ इतकी झाली आहे.

तसेच गेल्या २४ तासात ३७ हजार ६८१ जणांनी करोनावर मात केली असून २६० जणांचा मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत ३ कोटी २३ लाख ४२ हजार २९९ जणांनी करोनावर मात केली असून ४ लाख ४२ हजार ००९ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.

दिलासादायक म्हणजे करोना रुग्ण बरे होण्याचा प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात असून, रिकव्हरी रेट हा ९७.४९ टक्के इतका झाला आहे. तसेच आठवड्याचा पॉझिटिव्हीटी रेट २.३१ टक्के असून गेल्या ७७ दिवसांपासून हा दर ३ टक्क्यांपेक्षा कमी आहे. तर दैनंदिन पॉझिटिव्हीटी रेट हा १.९६ टक्के इतका असून गेल्या ११ दिवसांपासून तो ३ टक्क्यांहून कमी आहे.

महाराष्ट्रातील स्थिती काय?

राज्यात गुरुवारी ४ हजार २१९ नवीन करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे तसेच ५५ रुग्णांना आपला जीव गमवावा लागला. गुरुवारी २ हजार ५३८ रुग्ण करोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत ६३ लाख ९५ हजार २३६ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०४ टक्के इतकं आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com