<p>दिल्ली | Delhi</p><p>गेल्या २४ तासांत रुग्णसंख्येत वाढ झाली असून चिंता वाढवणारी आकडेवारी पुन्हा एकदा समोर आली आहे.</p>.<p>करोनामुळे देशातील परिस्थिती दिवसागणिक गंभीर होत आहे. गेल्या २४ तासांत रुग्णसंख्येत वाढ झाली असून चिंता वाढवणारी आकडेवारी पुन्हा एकदा समोर आली आहे.</p>.<p>गेल्या २४ तासात देशात तब्बल २५ हजार ३२० नवे करोनाबाधित सापडले आहेत. या वर्षभरातली ही एका दिवसातली सर्वात मोठी रुग्णवाढ आहे. त्यामुळे देशभरातील एकूण करोनाबाधितांचा आकडा आता १ कोटी १३ लाख ५९ हजार ०४८ इतका झाला आहे. देशात गेल्या २४ तासांमध्ये १६१ रुग्नाचा मृत्यू झाला असून १६ हजार ६३७ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. सध्या देशभरात २ लाख १० हजार ५४४ सक्रिय रुग्ण असून आतापर्यंत १ लाख ५८ हजर ६०७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.</p>