Coronavirus : देशात करोनाची काय आहे स्थिती?, वाचा आजची आकडेवारी

Coronavirus : देशात करोनाची काय आहे स्थिती?, वाचा आजची आकडेवारी

दिल्ली | Delhi

भारतात करोनाच्या दुसऱ्या लाटेना (Corona second wave) देशात हाहाकार माजवला होता. करोना रुग्णसंख्येने (Covid19 Patient) मोठा उच्चांक गाठला होता. दरम्यान, देशात आता करोनाचा प्रादुर्भाव हळूहळू कमी होताना दिसत आहे.

आरोग्य मंत्रालयाने (Ministry of Health) दिलेल्या माहितीनुसार गेल्या २४ तासांत देशात १९ हजार ७४० जणांना करोनाचा संसर्ग झाल्यामुळे उपचाराधीन रुग्णांची एकूण संख्या २ लाख ३६ हजार ६४३ वर पोहोचली. हा आकडा २०६ दिवसांतला सर्वात कमी आहे.

देशातील एकूण करोना संक्रमितांची संख्या ३ कोटी ३९ लाख ३०९ इतकी झाली आहे. गेल्या २४ तासात २४८ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. आतापर्यंत करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ४ लाख ३५ हजार ३७५ इतकी झाली आहे.

महाराष्ट्रातील स्थिती काय? (Maharashtra corona cases)

राज्यात करोनाची दुसरी लाट आता ओसरताना दिसत आहे. करोनाबाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत घट पाहायला मिळत आहे. राज्यात शुक्रवारी २ हजार ६२० नवीन करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली.

तर २ हजार ९४३ रुग्ण करोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत ६३ लाख ९७ हजार ०१८ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.३२ टक्के आहे. दरम्यान, राज्यात काल ५९ करोना संक्रमित रुग्णांचा मृत्यू झाला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com