COVID19 : देशात सक्रिय रुग्णांमध्ये मोठी घट, आज किती नवे रुग्ण?

COVID19 : देशात सक्रिय रुग्णांमध्ये मोठी घट, आज किती नवे रुग्ण?

दिल्ली | Delhi

भारतात करोनाच्या दुसऱ्या लाटेना (Corona second wave) देशात हाहाकार माजवला होता. करोना रुग्णसंख्येने (Covid19 Patient) मोठा उच्चांक गाठला होता. दरम्यान, देशात आता करोनाचा प्रादुर्भाव हळूहळू कमी होताना दिसत आहे.

आरोग्य मंत्रालयाने (Ministry of Health) दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या २४ तासांत करोनाचे ११ हजार ९०३ रुग्ण आढळले आहेत. ही रुग्णसंख्या सोमवारी पेक्षा तुलनेने थोडी जास्त आहे. तसेच गेल्या २४ तासांत नव्या रुग्णसंख्येसह ३११ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच गेल्या २४ तासांत १४ हजार १५९ रुग्ण करोनातून बरे झाले आहेत.

देशात सक्रिय रुग्णांमध्ये मोठी घट झाली असून देशात सध्या १ लाख ५१ हजार २०९ सक्रिय रुग्ण उपचाराधीन आहेत. ही सक्रिय रुग्णसंख्या गेल्या २५२ दिवसांतील सर्वात कमी आहे. देशभरात आतापर्यंत ३ कोटी ३६ लाख ९७ हजार ७४० जण करोनातून बरे झाले आहेत.

दरम्यान महाराष्ट्रात करोनाबाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत घट पाहायला मिळत आहे. राज्यात काल १ हजार ०७८ नवीन करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर १ हजार ०९५ रुग्ण करोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत ६४ लाख ५३ हजार ५८१ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.५९ टक्के आहे. राज्यात काल ४८ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर २.१२ टक्के झाला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com