COVID19 : भारतात काय आहे करोनाची सद्य स्थिती; जाणुन घ्या

COVID19 : भारतात काय आहे करोनाची सद्य स्थिती; जाणुन घ्या

दिल्ली | Delhi

भारतात करोनाच्या दुसऱ्या लाटेना (Corona second wave) देशात हाहाकार माजवला होता. करोना रुग्णसंख्येने (Covid19 Patient) मोठा उच्चांक गाठला होता. दरम्यान, देशात आता करोनाचा प्रादुर्भाव हळूहळू कमी होताना दिसत आहे.

आरोग्य मंत्रालयाने (Ministry of Health) दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत १२ हजार ८३० नव्या करोनाबाधितांची नोंद करण्यात आली असून ४४६ करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. तर १४ हजार ६६७ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

देशातील एकूण रुग्ण संख्या ०३ कोटी ४२ लाख ७३ हजार ३०० इतकी झाली आहे. यापैकी ४ लाख ५८ हजार १८६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत ३ कोटी ३६ लाख ५५ हजार ८४२ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. देशात करोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या दोन लाखांहून कमी आहे. एकूण १ लाख ५९ हजार २७२ रुग्ण करोनावर उपचार घेत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com