COVID19 : देशातील दैनंदिन रुग्णसंख्येत लक्षणीय घट, खबरदारी मात्र आवश्यक

जाणून घ्या आजची आकडेवारी
COVID19 : देशातील दैनंदिन रुग्णसंख्येत लक्षणीय घट, खबरदारी मात्र आवश्यक
Corona Update India

दिल्ली | Delhi

भारतात करोनाच्या दुसऱ्या लाटेना (Corona second wave) देशात हाहाकार माजवला होता. करोना रुग्णसंख्येने (Covid19 Patient) मोठा उच्चांक गाठला होता. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून देशात करोनाच्या (COVID19) आकडेवारीत चढ-उतार दिसत असतांना आज नव्या रुग्णसंख्येत लक्षणीय घट झाली आहे.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासात देशात करोनाचे (New corona patient today)१५ हजार ८२३ नवे रुग्ण आढळले आहेत. तर, सद्यस्थितीत देशात २ लाख ७ हजार ६५३ सक्रिय करोना रुग्ण आहेत. देशातील एकूण बाधितांची संख्या ३ कोटी ४० लाख १ हजार ७४३ इतकी झाली आहे.

तसेच देशात गेल्या २४ तासांत २२ हजार ८४४ रुग्ण करोनामुक्त झाले. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या आता ३ कोटी ३३ लाख ४२ हजार ९०१ वर पोहोचली आहे. काल दिवसभरात देशात २२६ मृत्यूंची नोंद झाली. त्यामुळे मृतांचा आकडा आता चार लाख ५१ हजार १८९ वर पोहोचला आहे.

Related Stories

No stories found.