भारतात करोनाचा विस्फोट! गेल्या २४ तासात २.३४ लाख नवे रुग्ण; महाराष्ट्रातील स्थिती काय?

... तर दररोजी रुग्णसंख्या लवकरच अडीच लाखांवर पोहचण्याची भीती
भारतात करोनाचा विस्फोट! गेल्या २४ तासात २.३४ लाख नवे रुग्ण; महाराष्ट्रातील स्थिती काय?
Corona

दिल्ली | Delhi

भारतात करोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव भयानक वेगाने वाढत आहे. करोनाच्या पहिल्या लाटेमध्ये देखील जितके रुग्ण आढळले नव्हते आणि जितक्या रुग्णांचा मृत्यू झाला नव्हता, ते करोनाचे आकडे आता दिसू लागले आहेत. करोनाग्रस्तांचा आकडा दररोज नवनवे विक्रम गाठताना दिसत आहे.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासात देशात तब्बल २ लाख ३४ हजार ६९२ नव्या करोना रुग्णांची नोंद झाली आहे. देशातील एकूण रुग्ण संख्या १ कोटी ४५ लाख २६ हजार ६०९ इतकी झाली आहे.

तसेच थोडीशी दिलासादायक बाब म्हणजे गेल्या २४ तासात १ लाख २३ हजार ३५४ जण उपचारानंतर बरे झाले असून १ हजार ३४१ जणांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत १ कोटी २६ लाख ७१ हजार २२० रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. देशात सक्रिय रुग्नांची संख्या १६ लाख ७९ हजार ७४० इतकी झाली असून मृतांची संख्या १ लाख ७५ हजार ६४९ इतकी झाली आहे.

ICMR दिलेल्या माहितीनुसार, देशात आतापर्यंत एकूण २६ कोटी ४९ लाख ७२ हजार ०२२ नमुन्यांची तपासणी करण्यात आलीय. यातील १४ लाख ९५ हजार ३९७ नमुन्यांची करोना चाचणी केवळ शुक्रवारी करण्यात आली.

महाराष्ट्रातील स्थिती काय?

महाराष्ट्रात शुक्रवारी दिवसभरात ६३ हजार ७२९ करोनाबाधित वाढले असून, ३९८ रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. राज्यातीलर मृत्यू दर १.६१ टक्के आहे. महाराष्ट्रात आजपर्यंत ५९ हजार ५५१ रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. दरम्यान, शुक्रवारी ४५ हजार ३३५ रूग्ण करोनातून बरे देखील झाले आहेत. राज्यात एकूण ३०,०४,३९१ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८१.१२ टक्के एवढे झाले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com