Corona Update : देशात करोनाची काय आहे स्थिती?

Corona Update : देशात करोनाची काय आहे स्थिती?

दिल्ली | Delhi

भारतात करोनाच्या दुसऱ्या लाटेना (Corona second wave) देशात हाहाकार माजवला होता. करोना रुग्णसंख्येने (Covid19 Patient) मोठा उच्चांक गाठला होता. दरम्यान, देशात आता करोनाचा प्रादुर्भाव हळूहळू कमी होताना दिसत आहे. करोनाचा प्रादुर्भाव होतांना दिसत असला तरी दैनंदिन रुग्ण संख्येत चढ उतार सुरूच आहे.

आरोग्य मंत्रालयाने (Ministry of Health) दिलेल्या माहितीनुसार देशात गेल्या २४ तासांत ३० हजार ७७३ करोनाबाधित आढळले असून ३०९ जणांचा मृत्यू झाला आहे. नवीन रुग्णांसह देशातील सक्रिय रुग्णांची संख्या ३ लाख ३२ हजार १५८ वर पोहोचली आहे.

देशातील एकूण रुग्णांची संख्या ३ कोटी ३४ लाख ४८ हजार १६३ इतकी झाली असून आतापर्यंत ३ कोटी २६ लाख ७१ हजार १६७ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत ४ लाख ४४ हजार ८३८ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.

दैनंदिन पॉझिटिव्हीटी रेट १.९७ टक्के असून गेल्या २० दिवासंच्या तुलनेत तीन टक्क्यांपेक्षा कमी आहे. दरम्यान देशात गेल्या २४ तासात ३८ हजार ९४५ रुग्ण बरे झाले असून ३०९ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com