Coronavirus : भारतात २४ तासांत तीन लाखांहून अधिक रुग्ण तर १.७८ लाख करोनामुक्त

दोन हजाराहून अधिक रुग्णांचा मृत्यू
Coronavirus : भारतात २४ तासांत तीन लाखांहून अधिक रुग्ण तर १.७८ लाख करोनामुक्त

दिल्ली l Delhi

भारतात करोनाचा कहर सुरु असून गेल्या २४ तासात करोनामुळे मृत्यू होण्याची संख्या वाढली असून मृतांच्या संख्येनेही आपला विक्रम मोडला आहे. प्रत्येक दिवशी सर्वाधिक मृत्यूंचा विक्रम स्थापित होत आहे. मृत्यूंचा आकडा स्थिरावत नसून तो सतत वाढत आहे.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासात देशात तब्बल ३ लाख १४ हजार ८३५ नव्या करोना रुग्णांची नोंद झाली आहे. देशातील एकूण रुग्ण संख्या १ कोटी ५९ लाख ३० हजार ९६५ इतकी झाली आहे.

तसेच गेल्या २४ तासात १ लाख ७८ हजार ८४१ जण उपचारानंतर बरे झाले असून २ हजार १०४ जणांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत १ कोटी ३४ लाख ५४ हजार ८८० रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत.

Title Name
Good News : ‘कोव्हॅक्सीन’ लस ‘डबल म्युटंट’ करोनाविरोधात प्रभावी - आयसीएमआर
Coronavirus : भारतात २४ तासांत तीन लाखांहून अधिक रुग्ण तर १.७८ लाख करोनामुक्त

देशात सक्रिय रुग्नांची संख्या २२ लाख ९१ हजार ४२८ इतकी झाली असून मृतांची संख्या १ लाख ८४ हजार ६५७ इतकी झाली आहे. तसेच देशात आतापर्यंत १३ कोटी २३ लाख ३० हजार ६४४ जणांचं लसीकरण करण्यात आलं आहे.

ICMR दिलेल्या माहितीनुसार, देशात आतापर्यंत एकूण २७ कोटी २७ लाख ०५ हजार १०३ नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. यातील १६ लाख ५१ हजार ७११ नमुन्यांची करोना चाचणी बुधवारी करण्यात आली.

Title Name
सीरम राज्य सरकारला ४०० रुपयांत तर खाजगी रुग्णालयांना ६०० रुपयात देणार लस
Coronavirus : भारतात २४ तासांत तीन लाखांहून अधिक रुग्ण तर १.७८ लाख करोनामुक्त

देशातील रुग्णसंख्येत सर्वाधित रुग्ण संख्या महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रात बुधवारी तब्बल ६७ हजार ४६८ नव्या करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. गेल्या २४ तासांत देशात नोंद झालेल्या रुग्णसंख्येपैकी २२ टक्के रुग्ण महाराष्ट्रातील आहेत. याशिवाय महाराष्ट्रात सर्वाधिक ५६८ मृत्यूची नोंद झाली.

दरम्यान, बिहार मधील पाटणा येथील एम्स रुग्णालयातील ३८४ डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाली आहे. पाटणा एम्सचे वैद्यकीय अधीक्षक यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com