COVID19 : देशात एकाच दिवसात आजवरची सर्वात मोठी रुग्णवाढ!

मृत्यूचा आकडाही चिंताजनक
COVID19 : देशात एकाच दिवसात आजवरची सर्वात मोठी रुग्णवाढ!

दिल्ली | Delhi

भारतात करोनाचा प्रसार मागच्या आठवड्यापासून प्रचंड वेगानं वाढत आहे. तर, रविवारी नोंद झालेल्या नवीन करोना रुग्णांच्या संख्येनं आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडले आहेत.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासात देशात तब्बल १ लाख ६८ हजार ९१२ नव्या करोना रुग्णांची नोंद झाली आहे. देशातील एकूण रुग्ण संख्या १ कोटी ३५ लाख २७ हजार ७१७ इतकी झाली आहे.

तसेच गेल्या २४ तासात ७५ हजार ०८६ जण उपचारानंतर बरे झाले असून ९०४ जणांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत १ कोटी २१ लाख ५६ हजार ५२९ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. देशात सक्रिय रुग्णांची संख्या १२ लाख ०१ हजार ००९ इतकी झाली असून मृतांची संख्या १ लाख ७० हजार १७९ इतकी झाली आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com