महाराष्ट्रात करोना रुग्णसंख्येत मोठी वाढ, उत्तरप्रदेश करोनाबाधित राज्य घोषित... देशातील स्थिती काय?

महाराष्ट्रात करोना रुग्णसंख्येत मोठी वाढ, उत्तरप्रदेश करोनाबाधित राज्य घोषित... देशातील स्थिती काय?
Corona

मुंबई | Mumbai

महाराष्ट्रातील करोना (corona update maharashtra) संसर्ग आटोक्यात आल्याचं बोललं जात असताना, आता पुन्हा एकदा करोनाबाधितांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे.

काल दिवसभरात महाराष्ट्रात आढळलेल्या नवीन करोनाबाधितांची संख्याही दोन हजारांच्याही पुढे गेल्याचे दिसून आले आहे. मागील दीड महिन्यात पहिल्यांदाच एका दिवसात २ हजारांहून जास्त रूग्ण आढळले असून, यामुळे यंत्रणा अलर्ट झाल्या आहेत.

Corona
नव्या वर्षात WhatsApp मध्ये येणार नवे फीचर्स, जाणून घ्या...

काल महाराष्ट्रात २ हजार १७२ करोना रुग्णांची नोंद झाली आहे. काल दिवसभरात २ हजार १७२ नवीन करोनाबाधित आढळले असून, १ हजार ९८ रूग्ण करोनामुक्त झाले. तर, २२ करोनाबाधित रूग्णांच्या मृत्यूची देखील नोंद झाली आहे. राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट ९७.६५ टक्के झाला आहे. तर मृत्यू दर हा गेल्या काही महिन्यांपासून २.१२ टक्के इतकाच आहे.

तसेच महाराष्ट्रात दिवसभरात एकाही ओमिक्रॉन (omicron) रूग्णाची नोंद झाली नाही ही त्यातल्या त्यात दिलासा देणारी बाब ठरली आहे. राज्यात आत्तापर्यंत ओमिक्रॉन व्हेरिएंटचे १६७ रूग्ण आहेत.

Corona
सोशल मीडियावर सनी लिओनीच्या अटकेची का होतेय मागणी?

पुन्हा लॉकडाऊन?

दरम्यान, करोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन (lockdown) लागणार का? अशी चर्चा सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख (Aslam Sheikh) यांनी लॉकडाऊनबाबत सूचक विधान केले आहे. राज्यामध्ये आणि मुंबईमध्ये आम्हाला पुन्हा लॉकडाऊन पाहायचा नाही आहे, आम्हाला लोकांवर लॉकडाऊन लादायचा नाही आहे, असे अस्लम शेख यांनी म्हटले आहे.

Corona
PHOTO : अंकिता लोखंडेचा मराठमोळा साज; नऊवारीत सौंदर्य दिसतय खुलून

उत्तर प्रदेश करोनाबाधित राज्य घोषित

उत्तर प्रदेशमध्ये (UttarPradesh) दिवसोंदिवस करोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने राज्याला करोनाबाधित राज्य म्हणून घोषित करण्यात आलंय. अतिरिक्त आरोग्य सचिव अमित मोहन प्रसाद यांनी २७ डिसेंबर रोजी जारी केलेल्या आदेशामध्ये राज्यातील करोना परिस्थितीचा आढावा घेत हा निर्णय घेण्यात आल्याचं म्हटलंय. उत्तर प्रदेश सार्वजनिक आरोग्य आणि साथ नियंत्रण कायदा २०२० च्या कलम तीन अंतर्गत संपूर्ण राज्य करोनाबाधित म्हणून घोषित करण्यात येत असल्याचं आदेशात म्हटलंय. राज्यापालांच्या नावाने हा आदेश जारी करण्यात आलाय. हा आदेश ३१ मार्च २०२२ किंवा पुढील आदेश येईपर्यंत लागू असणार आहे, असंही यात नमूद करण्यात आलंय. (Uttar pradesh declared covid affected state amid spike in new infections)

Corona
सुष्मिता सेन आणि रोहमन शॉलचे ब्रेकअप; पण...

देशातील स्थिती काय?

गेल्या २४ तासात देशात नऊ हजाराहून अधिक करोना रुग्णांची नोंद झाली आहे. आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या २४ तासांमध्ये ९ हजार १९५ नव्या करोना रुग्णांची नोंद झाली असून, ३०२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com