जो बायडन यांची फोनवरुन पंतप्रधान मोदींशी चर्चा

जो बायडन यांची फोनवरुन पंतप्रधान मोदींशी चर्चा

'या' विषयावर झाली चर्चा

दिल्ली | Delhi

करोना महामारीने संपूर्ण देशात थैमान घातलं आहे. देशात करोनाची दुसरी लाट आता भयंकर होत चालली आहे. देशात वाढत्या कोरोनाचा परिणाम आरोग्य यंत्रणेवर होताना दिसत आहे. असं असताना इतर अनेक देश भारताच्या मदतीसाठी पुढे सरसावताना दिसत आहे.

नुकतंच अमेरिकेने कोव्हिशिल्ड लसीच्या निर्मितीसाठी लागणारा कच्चा माल पुरवण्याची ग्वाही दिल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्यात फोनवरुन चर्चा झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केलं असून दोन्ही देशांमधील स्थितीवर चर्चा झाल्याची माहिती दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, 'जो बायडन यांच्याबरोबरील चर्चा फलद्रुप झाली. दोन्ही देशांमध्ये निर्माण झालेल्या करोना स्थितीवर आम्ही सविस्तर चर्चा केली. अमेरिकेकडून भारताला देण्यात आलेल्या सहकार्याबद्दल मी जो बायडन यांचे आभार मानले.' तसेच भारताकडून करोनाच्या दुसऱ्या लाटेला रोखण्यासाठी भारताकडून केल्या जात असलेल्या उपाययोजनांवरही चर्चा झाली असल्याचे त्यांनी सांगितले.

अमेरिकेकडून भारताला व्हेंटिलेटर, कोव्हिशिल्ड लसीच्या निर्मितीसाठी लागणारा कच्चा माल तसंच इतर साधनसामग्री पुरवली जाणार असल्याचं पंतप्रधान कार्यालयाकडून सांगण्यात आलं आहे.

करोनाच्या दुसऱ्या लाटेचा भारताला मोठा फटका बसलेला असून दैनंदिन रुग्णसंख्या तीन लाखांच्या पुढे गेली असताना युरोपिअन युनिअन, जर्मनी, फ्रान्, इंग्लंड तसंच अनके देश मदतीसाठी पुढे सरसावत आहेत. यानंतर अमेरिकेनेही भारताला मदत करण्याचा निर्णय घेतला.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com