करोना बाधितांची संख्या 21 लाखांच्या घरात
देश-विदेश

करोना बाधितांची संख्या 21 लाखांच्या घरात

गेल्या 24 तासांत 61,537 नवे बाधित

Dhananjay Shinde

Dhananjay Shinde

नवी दिल्ली |New Delhi -

देशातील करोना बाधितांची संख्या 21 लाखाच्या जवळ पोहोचली आहे, तर एकूण संख्या 42,518 झाली आहे. गेल्या 24 तासांत आढळलेल्या 61,537 नव्या बाधितांमुळे देशातील करोना संक्रमितांची संख्या 20 लाख 88 हजार 612 झाली आहे, तर गेल्या 24 तासांत झालेल्या 933 जणांच्या मृत्युमुळे देशातील मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या करोनाबळींची संख्या 42,518 वर पोहोचली. coronavirus patients in india

गेल्या 24 तासांत 48,900 बाधित बरे झाल्यामुळे देशात आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 14 लाख 27 हजार 6 झाली आहे. बरे झालेल्यांचे देशातील प्रमाण 68.32 टक्के आहे. देशातील प्रत्यक्ष बाधितांचे प्रमाण 6 लाख 19 हजार 88 आहे. ही टक्केवारी 29.64 टक्के आहे. शुक्रवारी करोनाच्या सर्वाधिक म्हणजे नव्या बाधितांची नोंद झाली होती. त्याखालोखाल आज दुसर्‍या दिवशी 61,537 नवे बाधित सापडले. देशात गेल्या 24 तासांत करोनाच्या 5 लाख 98 हजार 778 चाचण्या करण्यात आल्या, यामुळे देशात आतापर्यंत झालेल्या चाचण्यांची संख्या 2 कोटी 33 लाख 87 हजार 171 झाली आहे.

ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या 6 दिवसांतच भारतात करोनाचे 3 लाख 28 हजार 903 बाधितांची नोंद झालीे. ब्राझील आणि अमेरिकेतील बाधितांच्या संख्येपेक्षा भारतातील हा आकडा जास्त आहे. या काळात ब्राझीलमध्ये 2 लाख 51 हजार 264 तर अमेरिकेत 3 लाख 26 हजार 111 नव्या बाधितांची नोंद करण्यात आली. 2,3, 5 आणि 6 ऑगस्टला भारतात नोंदल्या गेलेल्या करोनाच्या नव्या बाधितांची संख्या जगातील अन्य कोणताही देशांपेक्षा जास्त होती.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com