देशात ‘इतके’ नवे करोना रुग्ण

देशात ‘इतके’ नवे करोना रुग्ण

नवी दिल्ली / New Delhi - देशात गेल्या 24 तासांत उपचारानंतर बरे झालेल्या 59 हजार 384 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे तर 46 हजार 617 नवे करोना (covid-19) पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. COVID-19 cases

देशातील एकूण बाधितांची संख्या 3,04,58,251 झाली असून, आतापर्यंत 2,95,48,302 रूग्ण करोनातून बरे झाले आहेत. देशातील अ‍ॅक्टिव्ह केसेसची संख्या 5,09,637 आहे. तर, आतापर्यंत देशात 4,00,312 रूग्ण करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय देशभरात आतापर्यंत 34,00,76,232 जणांचे लसीकरण झाले आहे.

देशभरात 1 जुलैपर्यंत 41,42,51,520 नमुन्यांची तपासणी करण्यात आलेली आहे. यापैकी 18,80,026 नमुने गुरुवारी (1 जुलै) तपासण्यात आले आहेत. आयसीएमआरच्या हवाल्याने एएनआयने हे वृत्त दिले आहे.

देशात ‘इतके’ नवे करोना रुग्ण
मराठा आरक्षण : केंद्राची पुनर्विचार याचिका फेटाळल्यानंतर संभाजीराजे म्हणाले...
No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com