पुण्यात आज ‘इतके’ करोना बळी

पुण्यात आज ‘इतके’ करोना बळी

1036 नवे रुग्ण

पुणे -

पुणे शहरात आज दिवसभरात नव्याने 1036 रुग्ण आढळल्याने 1 लाख 46 हजार 327 एवढी रुग्ण संख्या झाली आहे. तर आज दिवसभरात

42 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आज अखेर 3 हजार 528 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. करोनावर उपचार घेणार्‍या 1170 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे आज अखेर 1 लाख 26 हजार 430 रुग्ण करोना मुक्त झाले असल्याची माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागा मार्फत देण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात आज दिवसभरात 633 करोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून नऊ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर, 1 हजार 236 जण करोनामुक्त झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवड शहरात करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 78 हजार 714 वर पोहचली असून पैकी, 66 हजार 131 जण करोनातून बरे झाले आहे. महानगर पालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सक्रिय रुग्णांची संख्या 4 हजार 139 येवढी आहे अशी माहिती महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com