दिल्ली | Delhi

देशात गेल्या काही दिवसांपासून करोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असून परिस्थिती चिंताजनक होत आहे.

दोन आठवड्यांपासून देशातील करोना रुग्णसंख्या सतत वाढत असून केंद्र सरकार वारंवार लोकांना मास्क वापरणे तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याचे आवाहन करत आहे. मात्र काही ठिकाणी या नियमांचे पालन योग्य पद्धतीने होताना दिसत नाही.

गेल्या २४ तासात देशात तब्बल ५९ हजार ११८ नव्या रुग्णांची नोंद झाली असून देशातील करोनाबाधित एकूण संख्या १ कोटी १८ लाख ४६ हजार ६५२ इतकी झाली आहे.

देशात गेल्या २४ तासात ३२ हजार ९८७ रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून आतापर्यंत १ कोटी १२ लाख ६४ हजार ६३७ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत.

देशात गेल्या २४ तासात २५७ रुगणांचा मृत्यू झाला असून करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या १ लाख ६० हजार ९४९ इतकी आहे.

तर देशात सक्रिय रुग्णांची संख्या ४ लाख २१ हजार ६६ इतकी आहे, तर देशात आतापर्यंत ५ कोटी ५५ लाख ४ हजार ४४० जणांचं लसीकरण करण्यात आलं आहे.