Corona Update : देशात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९८.०७ टक्क्यांवर, आज किती नवे रुग्ण?

महाराष्ट्रातील स्थिती? (Corona update maharashtra)
Corona Update : देशात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९८.०७ टक्क्यांवर, आज किती नवे रुग्ण?

दिल्ली | Delhi

भारतात करोनाच्या दुसऱ्या लाटेना (Corona second wave) देशात हाहाकार माजवला होता. करोना रुग्णसंख्येने (Covid19 Patient) मोठा उच्चांक गाठला होता. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून देशात करोनाच्या (COVID19) आकडेवारीत चढ-उतार दिसत आहे. दिलासादायक बाब म्हणजे देशाचा रिकव्हरी रेट सध्या ९८.०७ टक्के आहे.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या २४ तासांत १८ हजार ९८७ करोना रुग्णांची नोंद (New corona patient today) करण्यात आली असून २४६ जणांचा मृत्यू (COVID19 death) झाला आहे. तसेच १९ हजार ८०८ रुग्ण करोनातून बरे झाले आहेत. या नवीन बाधितांसह एकूण रुग्णसंख्या ३ कोटी ४० लाख २० हजार ७३०वर पोहोचली आहे.

आतापर्यंत ३ कोटी ३३ लाख ६२ हजार ७०९ रुग्ण करोनातून बरे झाले आहेत. तर, ४ लाख ५१ हजार ४३५ जणांना करोनामुळे जीव गमवावा लागला आहे. देशात सध्या २ लाख ६ हजार ५८६ सक्रिय रुग्ण (Corona active cases) आहेत.

महाराष्ट्रातील स्थिती? (Corona update maharashtra)

राज्यात काल (बुधवारी) २ हजार २१९ नवीन करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर ३ हजार १३९ रुग्ण करोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत ६४ लाख ११ हजार ०७५ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.३८ टक्के आहे.

Related Stories

No stories found.