Coronavirus : देशभरात गेल्या २४ तासांत अडीच लाखांहून अधिक रुग्ण बरे

तर ३.२३ लाख नवे रुग्ण
Coronavirus : देशभरात गेल्या २४ तासांत अडीच लाखांहून अधिक रुग्ण बरे

दिल्ली | Delhi

करोना महामारीने संपूर्ण देशात थैमान घातलं आहे. देशात करोनाची दुसरी लाट आता भयंकर होत चालली आहे. दररोज तीन लाखांहून अधिक नव्या करोनाबाधित रुग्णांची नोंद होताना दिसत आहे. यामुळे देशात सक्रीय रुग्णांचा आकडादेखील मोठ्या प्रमाणात वाढत आहे. परंतु, यामध्ये दिलासा देणारी बातमी म्हणजे सक्रीय रुग्णांसोबत करोनापासून मुक्त होणार्‍यांचे प्रमाणदेखील वाढतच आहे.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासात देशात तब्बल ३ लाख २३ हजार १४४ नव्या करोना रुग्णांची नोंद झाली आहे. देशातील एकूण रुग्ण संख्या १ कोटी ७६ लाख ३६ हजार ३०७ इतकी झाली आहे.

तसेच गेल्या २४ तासात २ लाख ५१ हजार ८२७ जण उपचारानंतर बरे झाले असून २ हजार ७७१ जणांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत १ कोटी ४५ लाख ५६ हजार २०९ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत.

Title Name
तिरंगाच्या रंगात रंगला दुबईचा 'बुर्ज खलिफा', पाहा व्हिडिओ
Coronavirus : देशभरात गेल्या २४ तासांत अडीच लाखांहून अधिक रुग्ण बरे

देशात सक्रिय रुग्नांची संख्या २८ लाख ८२ हजार २०४ इतकी झाली असून मृतांची संख्या १ लाख ९७ हजार ८९४ इतकी झाली आहे. तसेच देशात आतापर्यंत १४ कोटी ५२ लाख ७१ हजार १८६ जणांचं लसीकरण करण्यात आलं आहे.

महाराष्ट्रातील स्थिती काय?

राज्यात मागील काही दिवसांच्या तुलनेत सोमवारी झालेल्या करोना मृतांच्या संख्येत घट नोंदवली गेली आहे. राज्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या ४३ लाखाहून अधिक झाली आहे. तर, करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्याही ६५ हजाराच्या पुढे गेली आहे. राज्यात रविवारी सर्वाधिक ८३२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर सोमवारी यात घट होऊन ५२४ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत ६५ हजार २८४ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. सोमवारी राज्यात ४८ हजार ७०० पेक्षा कमी रुग्णांची नोंद झाली आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com