Coronavirus : सलग दुसऱ्या दिवशी दोन लाखांहून अधिक रुग्णांची नोंद, मृत्युदर १.२३ टक्क्यांवर

महाराष्ट्रातील स्थिती काय?
Coronavirus : सलग दुसऱ्या दिवशी दोन लाखांहून अधिक रुग्णांची नोंद, मृत्युदर १.२३ टक्क्यांवर

दिल्ली | Delhi

करोनाचा उद्रेक दिवसागणिक वाढताना दिसून येत आहे. देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेनं जेरीस आणलं असून, प्रचंड वेगानं संक्रमण होत आहे. दररोज मोठ्या संख्येने नवीन करोनाबाधित सापडत आहे. देशात गेल्या २४ तासात करोना रुग्णवाढीचा आतापर्यंतचा उच्चांक नोंदवला गेला आहे.

देशात करोनाचा शिरकाव झाल्यापासूनची ही उच्चांकी रुग्णवाढ असून, करोनामुळे मृत्यू होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेली आकडेवारी सरकार आणि आरोग्य व्यवस्थेची झोप उडवणारी आहे.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासात देशात तब्बल २ लाख १७ हजार ३५३ नव्या करोना रुग्णांची नोंद झाली आहे. देशातील एकूण रुग्ण संख्या १ कोटी ४२ लाख ९१ हजार ९१७ इतकी झाली आहे.

Title Name
बाधिताच्या जवळ 1 मिनिट राहिल्यासही होऊ शकतो करोना
Coronavirus : सलग दुसऱ्या दिवशी दोन लाखांहून अधिक रुग्णांची नोंद, मृत्युदर १.२३ टक्क्यांवर

तसेच गेल्या २४ तासात १ लाख १८ हजार ३०२ जण उपचारानंतर बरे झाले असून १०२७ जणांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत १ कोटी २५ लाख ४७ हजार ८६६ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. देशात सक्रिय रुग्नांची संख्या १५ लाख ६९ हजार ७४३ इतकी झाली असून मृतांची संख्या १ लाख ७४ हजार ३०८ इतकी झाली आहे.

दरम्यान, देशात आतापर्यंत एकूण २६ कोटी ३४ लाख ७६ हजार ६२५ नमुन्यांची तपासणी करण्यात आलीय. यातील १४ लाख ७३ हजार २१० नमुन्यांची करोना चाचणी केवळ गुरुवारी करण्यात आली.

उत्तराखंड मधील हरिद्वारच्या कुंभमेळा क्षेत्रात १० ते १४ एप्रिल या कालावधीत १७०० हून अधिक लोक करोनाबाधित झाले आहेत. त्यामुळे जगातील सर्वात मोठ्या धार्मिक मेळाव्यांपैकी एक असलेल्या या मेळाव्यामुळे करोनाच्या प्रकरणांमध्ये आणखी वेगाने वाढ होण्यास हातभार लागेल अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.

तसेच, दिल्लीत वाढत करोनाचा प्रादुर्भाव पाहता मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सप्ताहाच्या अखेरीस संचारबंदी जारी करण्यासह अनेक निर्बंध घालण्यात येणार असल्याचे गुरुवारी जाहीर केले. मॉल, व्यायामशाळा, स्पा आणि सभागृहे बंद ठेवण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. उपाहारगृहांमध्ये बसून भोजन करण्यावर निर्बंध घालण्यात आले असून चित्रपटगृहांमध्ये एकूण क्षमतेपैकी केवळ ३० टक्केच प्रेक्षकांना परवानगी देण्यात आली आहे.

Title Name
दिल्लीही महाराष्ट्राच्या मार्गावर; विकेण्ड कर्फ्यूची घोषणा
Coronavirus : सलग दुसऱ्या दिवशी दोन लाखांहून अधिक रुग्णांची नोंद, मृत्युदर १.२३ टक्क्यांवर

महाराष्ट्रातील स्थिती काय?

महाराष्ट्रातील करोनाबाधित रुग्णांची संख्या अत्यंत झपाट्याने वाढत आहे. दररोज मोठ्या संख्येनं रुग्ण आढळून येत असून, रूग्णांच्या मृत्यूच्या संख्येतही भरच पडत आहे. गुरुवारी करोनाबाधितांच्या संख्येनं आजपर्यंतचा उच्चांक गाठल्याचं दिसून आलं. दिवसभरात राज्यात तब्बल ६१ हजार ६९५ करोनाबाधित वाढले असून, ३४९ रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर १.६३ टक्के एवढा आहे. राज्यात सध्या ०६ लाख २० हजार ०६० रुग्ण उपचार घेत आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com