मोठा दिलासा! तब्बल २०० दिवसानंतर दैनंदिन रुग्णसंख्या २० हजारांच्या आत

सक्रिय प्रकरणांची संख्या ३ लाखांच्या खाली
मोठा दिलासा! तब्बल २०० दिवसानंतर दैनंदिन रुग्णसंख्या २० हजारांच्या आत

दिल्ली | Delhi

भारतात करोनाच्या दुसऱ्या लाटेना (Corona second wave) देशात हाहाकार माजवला होता. करोना रुग्णसंख्येने (Covid19 Patient) मोठा उच्चांक गाठला होता.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून देशात करोनाच्या (COVID19) आकडेवारीत चढ-उतार दिसत आहे. आता पुन्हा एकदा रुग्णसंख्या कमी होताना दिसत आहे. गेल्या २४ तासात आदल्या दिवसाच्या तुलनेत नव्या कोरोना बाधितांच्या संख्येत जवळपास ८ हजारांनी घट झाली आहे.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासात देशात करोनाचे (New corona patient today) १८ हजार ७९५ नवे रुग्ण आढळले आहेत. तर १७९ जणांचा करोनामुळे मृत्यू (COVID19 death) झाला आहे. आतापर्यंत देशात एकूण ३ कोटी ३६ लाख ९७ हजार ५८१ जणांना करोनाची लागण (Corona total patient) झाली आहे.

तसेच देशात सध्या २ लाख ९२ हजार २०६ सक्रीय रुग्ण (Corona active cases) आहेत. तर ३ कोटी २९ लाख ५८ हजार ००२ जणांनी आतापर्यंत करोनावर मात केली आहे. तर करोनामुळे ४ लाख ४७ हजार ३७३ जणांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान केरळमध्ये करोनाचा प्रादुर्भाव (Kerala Corona Update) कमी होताना दिसत नाही. गेल्या २४ तासात वाढलेल्या रुग्णसंख्येमध्ये सर्वाधिक रुग्णसंख्येची नोंद ही केरळमध्ये झाली आहे. देशात गेल्या २४ तासात आढळलेल्या एकूण करोनाग्रस्तांपैकी एकट्या केरळमध्ये काल ११ हजार ६९९ रुग्ण आढळले आहेत. तर ५८ जणांचा मृत्यू झाला आहे.. (New covid19 patient in keral)

महाराष्ट्रातील स्थिती? (Corona update maharashtra)

करोनाच्या रुग्णसंख्येचा आलेख राज्यातही खाली येताना पहायला मिळत असून करोनाबाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत घट पाहायला मिळत आहे. राज्यात सोमवारी २ हजार ८९५ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून ३२ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

राज्यात काल २ हजार ४३२ रुग्ण करोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत ६३ लाख ६२ हजार २४८ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.२६ टक्के आहे.

Related Stories

No stories found.