Corona Update : टेन्शन वाढलं! देशात सलग दुसऱ्या दिवशी रुग्ण संख्येत वाढ

Corona Update : टेन्शन वाढलं! देशात सलग दुसऱ्या दिवशी रुग्ण संख्येत वाढ
Corona

दिल्ली | Delhi

भारतात करोनाच्या दुसऱ्या लाटेना (Corona second wave) देशात हाहाकार माजवला होता. करोना रुग्णसंख्येने (Covid19 Patient) मोठा उच्चांक गाठला होता. दरम्यान, देशात आता करोनाचा प्रादुर्भाव हळूहळू कमी होताना दिसत होता. मात्र देशातील करोना रुग्णसंख्या पुन्हा वाढली असून कालच्या तुलनेत आज ९ हजार रुग्णांची वाढ झाली आहे.

आरोग्य मंत्रालयाने (Ministry of Health) दिलेल्या माहितीनुसार देशात गेल्या २४ तासांत ४६ हजार १६४ नव्या रुग्णांची नोंद झाली असून ६०७ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच गेल्या २४ तासात ३४ हजार १५९ रुग्ण करोनामुक्त झाले आहे. भारतातील एकूण रुग्णसंख्या ३ कोटी २५ लाख ५८ हजार ५३० इतकी झाली असून आतापर्यंत करोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ३ कोटी १७ लाख ८८ हजार ४४० वर पोहोचली आहे. देशात सध्या ३ लाख ३३ हजार ७२५ सक्रिय रुग्ण उपचाराधिन असून आतापर्यंत ४ लाख ३६ हजार ३६५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

महाराष्ट्रातील स्थिती काय? (Maharashtra corona cases)

राज्यात मंगळवारी ५ हजार ०३१ नवीन करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून ४ हजार ३८० रुग्ण करोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत ६२ लाख ४७ हजार ४१४ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०४ टक्के आहे. राज्यात मंगळवारी २१६ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असल्याने राज्याचा मृत्यूदर २.१२ टक्के झाला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com