COVID19 : तिसऱ्या लाटेला सुरवात?; गेल्या २४ तासात ४६ हजाराहून अधिक रुग्णांची नोंद

केरळमध्ये कहर; महाराष्ट्रातील स्थिती काय?
COVID19 : तिसऱ्या लाटेला सुरवात?; गेल्या २४ तासात ४६ हजाराहून अधिक रुग्णांची नोंद

दिल्ली | Delhi

भारतात करोनाच्या दुसऱ्या लाटेना (Corona second wave) देशात हाहाकार माजवला होता. करोना रुग्णसंख्येने (Covid19 Patient) मोठा उच्चांक गाठला होता. दरम्यान, देशात आता करोनाचा प्रादुर्भाव हळूहळू कमी होताना दिसत होता. मात्र देशात करोनाचं संकट पुन्हा घोंगावत असल्याचं चित्र आहे. मागच्या काही दिवसात करोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे करोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका निर्माण झाला आहे.

COVID19 : तिसऱ्या लाटेला सुरवात?; गेल्या २४ तासात ४६ हजाराहून अधिक रुग्णांची नोंद
Tokyo 2020 Paralympics : भाविना पटेल इतिहास रचणार?

आरोग्य मंत्रालयाने (Ministry of Health) दिलेल्या माहितीनुसार देशात गेल्या २४ तासांत ४६ हजार ७५९ नव्या रुग्णांची नोंद झाली असून ५०९ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच गेल्या २४ तासात ३१ हजार ३७४ रुग्ण करोनामुक्त झाले आहे. भारतातील एकूण रुग्णसंख्या ३ कोटी २६ लाख ४९ हजार ९४७ इतकी झाली असून आतापर्यंत करोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ३ कोटी १८ लाख ५२ हजार ८०२ वर पोहोचली आहे. देशात सध्या ३ लाख ५९ हजार ७७५ सक्रिय रुग्ण उपचाराधिन असून आतापर्यंत ४ लाख ३७ हजार ३७० रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

देशात आतापर्यंत ६२ कोटींपेक्षा जास्त नागरिकांना लस

देशात आतापर्यंत ६२ कोटी २९ लाख ८९ हजार १३४ जणांचं लसीकरण करण्यात आलं आहे. गेल्या २४ तासात १ कोटी ३ लाख ३५ हजार २९० जणांना करोना प्रतिबंधक लस देण्यात आली आहे.

केरळमध्ये कहर

देशातील करोना रुग्णसंख्या वाढण्याचे सर्वात महत्वाचे कारण म्हणजे केरळमध्ये वाढलेली विक्रमी रुग्णसंख्या. केरळमध्ये शुक्रवारी ३२ हजार ८०१ नवे करोना रुग्ण आढळलेत आणि 179 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

COVID19 : तिसऱ्या लाटेला सुरवात?; गेल्या २४ तासात ४६ हजाराहून अधिक रुग्णांची नोंद
काबूल स्फोटाचा अमेरिकेने घेतला बदला; ISIS च्या बालेकिल्ल्यावर 'एअर स्ट्राईक'

महाराष्ट्रातील स्थिती काय? (Maharashtra corona cases)

महाराष्ट्रात करोनाची दुसरी लाट ओसरल्याचे चित्र आहे. राज्यात दररोज पाच ते सहा हजारांच्या दरम्यान रुग्ण संख्या आढळत आहे. राज्यात काल दिवसभरात ४ हजार ६५४ नवीन रुग्णांची नोंद झाली. तर काल दिवसभरात ३ हजार ३०१ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून करोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ६२ लाख ५५ हजार ४५१ इतकी आहे. राज्यात काल १७० रुग्ण दगावले असून राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्क्यांवर पोहोचला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com