'या' देशाकडून करोनामुक्त झाल्याची घोषणा!; मास्क बंधनकारक नाही

शाळा कॉलेजेस पूर्ववत
'या' देशाकडून करोनामुक्त झाल्याची घोषणा!; मास्क बंधनकारक नाही

दिल्ली | Delhi

भारतासह जगभरातील देशांत करोनाने हाहा:कार माजविला आहे. एकीकडे जगभरातील अनेक देशांमध्ये करोनाचं थैमान सुरू असताना दुसरीकडे एका देशानं करोनमुक्त झाल्याची घोषणा केली आहे.

इस्रायलनं आता सार्वजनिक ठिकाणी आणि खुल्या शाळांमध्ये मास्क बंधनकारक नसेल असं जाहीर केलं आहे. लसीकरणाच्या जोरावर इस्रायलने हे करुन दाखवलं आहे. इस्रायलमध्ये लसीकरणाच्या जोरावर करोनाचा फैलाव आटोक्यात आणण्यात आला आहे. त्यामुळे इस्रायलमध्ये आता सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणं बंधनकारक नसेल. आरोग्य अधिकाऱ्यांनी सार्वजनिक ठिकाणी मास्क घालण्यास देखील सूट दिली आहे. मात्र मोठ्या सभा, सोहळ्यांमध्ये मास्क घालणं बंधनकारक असल्याचे सांगितले आहे.

इस्रायलने अत्यंत वेगाने लसीकरण करून तब्बल ६० टक्के लोकांना करोना लसीचे दोन्ही डोस दिले आहेत. आतापर्यंत इस्रायलमधील ९३ लाख लोकांना फायझरची लस टोचण्यात आली आहे. ही लस ९० टक्के प्रभावी असल्याचे सांगितले जाते. गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात इस्रायलमध्ये लसीकरणाला सुरुवात झाली. त्यानंतर देशातील करोनाच्या मृत्यूदरात घट झाली.

जगात करोनाची साथ आल्यापासून इस्रायलमध्ये आतापर्यंत ८.३६ लाख नागरिकांना कोरोनाची बाधा झाली आहे. देशातील एकूण ६ हजार ३३१ लोकांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.

दरम्यान, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान मारिस स्काटसन यांनी रविवारी ऑस्ट्रेलिया जवळजवळ करोना मुक्त झाल्याची घोषणा केली आहे. अर्थात करोनामुक्ती मिळाली असली तरी ऑस्ट्रेलियाच्या सीमा लगेच अन्य देशांसाठी खुल्या केल्या जाणार नाहीत असे त्यांनी स्पष्ट केले आहे. मार्च २०२० पासून ऑस्ट्रेलियन सरकारने देशाच्या सीमा बंद केल्या आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com