देशात 24 तासांत करोनाचे 52 हजार रुग्ण
देश-विदेश

देशात 24 तासांत करोनाचे 52 हजार रुग्ण

एकूण रुग्णसंख्या 19 लाखांच्यावर

Dhananjay Shinde

Dhananjay Shinde

नवी दिल्ली | New Delhi -

गेल्या 24 तासांत देशात करोनाचे 52 हजार रुग्ण सापडले आहेत. coronavirus त्यामुळे देशातील एकूण रुग्णांची संख्या 19 लाखांच्यावर गेली आहे. तर गेल्या 24 तासांत 857 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत 12 लाखांहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत.covid 19

देशात एकूण रुग्णांची संख्या ८ हजार २५५ इतकी झाली आहे. आतापर्यंत 39 हजार 795 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात सध्या सक्रिय रुग्णांची संख्या 5 लाख 86 हजार इतकी आहे. दिल्लीत करोना रुग्णांची संख्या 9 हजार 897 इतकी झाली आहे.

देशात करोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 66.3 टक्के इतके आहे. गेल्या 24 तासांत 44 हजार 306 रुग्ण बरे झाले आहेत. तर गेल्या 24 तासांत 6 लाख 61 हजार 892 करोना चाचणी करण्यात आल्या आहेत.

महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण सापडले आहेत. राज्यात आतापर्यंत 4 लाख 41 हजार 228 रुग्ण सापडले असून 15 हजार 576 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तमिळनाडूत 2 लाख 57 हजार 613 रुग्ण सापडले असून 4 हजार 132 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com