Corona Update : देशात करोना वाढतोय; आज तब्बल ‘इतक्या’ रुग्णांची नोंद

महाराष्ट्रातील स्थिती काय?
Corona Update : देशात करोना वाढतोय; आज तब्बल ‘इतक्या’ रुग्णांची नोंद

दिल्ली | Delhi

देशात करोनाचा कहर पाहायला मिळत असून दैनंदिन करोनाबाधितांच्या संख्येत (Corona Cases In India) चढउतार पाहायला मिळत आहेत. गेल्या २४ तासांत करोनाबाधितांमध्ये १२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. काही तज्ज्ञांनी करोनाच्या तिसऱ्या लाटेची (Corona third wave) सुरुवात म्हणून या संक्रमणाच्या वाढलेल्या आकड्याकडे पाहिलं जात असल्याचं म्हटलं आहे.

आरोग्य मंत्रालयाने (Ministry of Health) दिलेल्या माहितीनुसार देशात गेल्या २४ तासांत ४७ हजार ०९२ जणांना करोनाचा (COVID new patient today) संसर्ग झाला आहे. त्यामुळे, देशात सद्यस्थितीत करोनावर उपचार घेणाऱ्यांचा (Corona active patient) एकूण आकडा ३ लाख ८९ हजार ५८३ वर पोहोचला आहे. तर दुसरीकडे याच २४ तासांत देशात ३५ हजार १८१ जण करोनामुक्त होऊन रुग्णालयातून घरी गेले आहेत. त्यामुळे देशातील एकूण करोनामुक्त झालेल्यांची संख्या आता ३ कोटी २० लाख २८ हजार ८२५ वर पोहोचली आहे.

देशात आतापर्यंत एकूण ३ कोटी २८ लाख ५७ हजार ९३७ करोना रुग्णांची नोंद (Corona cases in india) झाली आहे. तर, गेल्या २४ तासांत देशात ५०९ इतक्या लोकांचा करोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद आहे. त्यामुळे, देशातील करोनामुळे झालेल्या मृत्यूंचा आकडा आता ४ लाख ३९ हजार ५२९ वर (Corona death in india) पोहोचला आहे.

केरळमध्ये सर्वाधिक रुग्ण (Keral corona update)

भारतात केरळमध्ये सर्वात जास्त रुग्णवाढ पाहायला मिळत आहे. बुधवारी, केरळमध्ये करोनाचे ३२ हजार ८०३ नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली. तर संक्रमणामुळे आणखी १७३ लोकांचा मृत्यू झाला. नवीन बाधितानंतर, करोनाचा संसर्ग झालेल्यांची एकूण संख्या ४० लाख ९० हजार ३६ पर्यंत वाढली आहे तर मृतांची संख्या २० हजार ९६१ वर पोहोचली आहे.

महाराष्ट्रातील स्थिती काय? (Coronavirus Maharashtra Highlights)

राज्यात काल ४ हजार ४५६ नवीन करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर ४ हजार ४३० रुग्ण करोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत ६२ लाख ७७ हजार २३० रुग्णांनी करोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०३ टक्के आहे. राज्यात काल १८३ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून राज्याचा मृत्यूदर २.१२ टक्के झाला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com