भारतात Corona चा उद्रेक! नव्या ३७,३७९ रुग्णांची नोंद तर Omicron चेही १८०० पार

भारतात Corona चा उद्रेक! नव्या ३७,३७९ रुग्णांची नोंद तर Omicron चेही १८०० पार

दिल्ली | Delhi

दोन वर्षांपासून देशावर करोनाचे (covid19) संकट आहे. गेल्या काही दिवसांपासून करोनाचे (corona update india) रुग्ण झपाट्याने कमी होत असल्यामुळे करोनाचे संकट टळले असे वटत होते. मात्र पुन्हा एकदा देशात करोनाचा धोका वाढत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. करोनाबरोबर ओमिक्रॉनच्या रुगणसंख्येत (Omicron variant) देखील वाढ होत आहे.

देशात गेल्या २४ तासात तब्बल ३७ हजार ३७९ नवे रुग्ण सापडले आहेत. तर दिवसभरात १२४ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच ११ हजार ७ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले असून आतापर्यंत ३ कोटी ४३ लाख ६ हजार ४१४ जणांनी करोनावर मात केली आहे. तर ४ लाख ८२ हजार १७ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशात १ लाख ७१ हजार ८३० जण करोनावर उपचार घेत आहेत.

देशात सुरु असलेल्या लसीकऱण मोहिमेत १४६ कोटी ७० लाख १८ हजार ४६४ डोस देण्यात आले आहेत. तसेच देशात १५ ते १८ वयोगटातील मुलांसाठी लसीकऱण मोहिम सुरु करण्यात आली आहे. या वयोगटाला कोव्हॅक्सिन लशीचे डोस दिले जाणार आहे. आतापर्यंत लसीकरणासाठी ५५ लाखांहून अधिक जणांनी नोंदणी केली आहे. तर काल दिवसभरात ४० लाखाहून अधिक जणांनी पहिला डोस घेतला आहे.

देशभरात करोनाचा (Coronavirus) प्रादुर्भाव मोठ्या वेगाने वाढत आहे. करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आता सरकारकडून निर्बंध लावण्यास सुरुवात झाली आहे. त्यातच आता केंद्र सरकारने (Central Government) त्यांच्या कार्यालयांसाठी नवीन कोरोना मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. केंद्रीय कर्मचाऱ्यांची बायोमेट्रिक यंत्रणेद्वारे नोंदविली जाणारी हजेरी ३१ जानेवारीपर्यंत स्थगित केली आहे. कार्यालयात बायोमेट्रिक पद्धतीने हजेरी लागत असताना संसर्गाचा प्रसार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. गर्भवती महिलांना कार्यालयात येण्याचे बंधन नाही तसेच केवळ ५० टक्के कर्मचारी काम करतील.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com