दिल्ली | Delhi

करोनाचे संकट अद्यापही कायम असून देशातील काही राज्यातील परिस्थिती अद्यापही चिंताजनक आहे. देश करोनातून बाहेर पडत पुन्हा एकदा अर्थव्यवस्था रुळावर आणत सावरण्याचा प्रयत्न करत असतानाच काही राज्यांमध्ये अद्यापही लॉकडाउन सारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासात देशात तब्बल ८१ हजार ४४६ नव्या करोना रुग्णांची नोंद झाली आहे. एका दिवसात नोंद होणारी ही गेल्या सहा महिन्यातील सर्वाधिक रुग्णवाढ आहे. देशातील एकूण रुग्ण संख्या १ कोटी २३ लाख ३ हजार १३१ इतकी झाली आहे.

तसेच गेल्या २४ तासात ५० हजार ३५६ जण उपचारानंतर बरे झाले असून ४६९ जणांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत १ कोटी १५ लाख २५ हजार ३९ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत.

देशात सक्रिय रुग्नांची संख्या ६ लाख १४ हजार ६९६ इतकी झाली असून मृतांची संख्या १ लाख ६३ हजार ३९६ इतकी झाली आहे. तर देशात आतापर्यंत ६ कोटी ८७ लाख ८९ हजार १३८ जणांचं लसीकरण करण्यात आलं आहे.

दरम्यान, वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर केंद्राची सर्व राज्यांसोबत सकाळी ११ वा. बैठक होणार आहे. कॅबिनेट सचिव मुख्य सचिवांशी करणार चर्चा असून उपस्थित राहणार या बैठकीस आरोग्य मंत्रालयाचे अधिकारीही उपस्थित राहणार आहे.

करोना रुग्णवाढीत महाराष्ट्र आघाडीवर असून लवकरच ठाकरे सरकाकडून कडक निर्बंध लावले जाण्याची शक्यता आहे. दरम्यान राज्यात काल तब्बल ४३ हजार १८३ नव्या करोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर २४९ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला. तसेच काल ३२ हजार ६४१ आज करोनातून पूर्णपणे बरे झाले आहेत. महाराष्ट्रात सध्या ३ लाख ६६ हजार ५३३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ८५.२% झाले आहे. राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या २८ लाख ५६ हजार १६३ झाली आहे.