देशात करोनामुळे 196 डॉक्टरांचा मृत्यू
देश-विदेश

देशात करोनामुळे 196 डॉक्टरांचा मृत्यू

आयएमएची पंतप्रधानांना लक्ष घालण्याची विनंती

Dhananjay Shinde

Dhananjay Shinde

नवी दिल्ली | New Delhi -

देशात करोनामुळे आतापर्यंत 200 डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे. इंडियन मेडिकल असोसिएशननं (आयएमए) ही आकडेवारी जाहीर केली आहे. आयएमएनं यावर चिंता व्यक्त करत पंतप्रधानांनी या विषयात लक्ष घालावे अशी विनंती केली आहे. Indian Medical Association (IMA)

आयएमएनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं आहे. केंद्र सरकारनं डॉक्टरांसाठी आणि त्यांच्या कुटुंबीयांची काळजी घेण्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी केली आहे. सर्व क्षेत्रातील डॉक्टरांना सरकारच्या वतीनं आरोग्य व जीवन विमा देण्यात यावा, असंही पत्रात म्हटलं आहे.

याविषयी बोलताना आयएमएचे अध्यक्ष डॉ. राजन शर्मा म्हणाले, आयएमए देशातील साडेतीन लाख डॉक्टरांचं प्रतिनिधित्व करणारी संघटना आहे. त्यामुळे हे नमूद करणं गरजेचं आहे, करोना शासकीय व खासगी क्षेत्र असा भेदभाव करत नाही आणि सगळ्यांना समानपणे प्रभावित करत आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com