देशात 24 तासांत 1,092  करोना रुग्णांचा मृत्यू
देश-विदेश

देशात 24 तासांत 1,092 करोना रुग्णांचा मृत्यू

64 हजार 531 नव्या रुग्णांची नोंद

Dhananjay Shinde

Dhananjay Shinde

नवी दिल्ली | New Delhi -

गेल्या 24 तासांत देशात तब्बल 64 हजार 531 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनामुळे 1,092 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिली आहे.

तसेच, देशातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या वाढून आता 27 लाख 67 हजार 274 इतकी झाली आहे. तर देशात सध्या 6 लाख 76 हजार 274 रुग्णांवर उपचार सूर आहेत. तसेच, आतापर्यंत 20 लाख 37 हजार 871 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. देशात कोरोनामुळे आतापर्यंत एकूण 52 हजार 889 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. coronavirus patient in india

दरम्यान, देशात चाचण्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली आहे. 18 ऑगस्टला देशात 8 लाख 1 हजार 518 चाचण्या करण्यात आल्या आहेत. तर, देशात 18 ऑगस्टपर्यंत एकूण 3 कोटी 17 लाख 42 हजार 782 कोरोना चाचण्या करण्यात आल्याची माहिती भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) दिली आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com