करोना इफेक्ट : ‘सॅनिटाइझ’मुळे 17 कोटी खराब

जुन्या नोटांबरोबरच यावर्षीच्या नव्या नोटा देखील खराब
करोना इफेक्ट : ‘सॅनिटाइझ’मुळे 17 कोटी खराब

नवी दिल्ली | New Delhi -

करोना संसर्गाच्या भीतीने अनेकजण नोटा सॅनिटाइझ करत आहेत. सॅनिटाइझ केल्यामुळे, धुवून वाळवल्यामुळे मोठ्या संख्येने

चलनातील नोटा खराब झाल्या आहेत. आरबीआयकडे यावेळी खराब झालेल्या 2 हजाराच्या 17 कोटींपेक्षा जास्त नोटा आल्या आहेत. याशिवाय 200, 500, 20 आणि 10 च्या नोटा देखील मोठ्या प्रमाणात खराब झाल्या आहेत.

आरबीआयच्या अहवालानुसार यावर्षी 2 हजाराच्या 17 कोटींपेक्षा अधिक नोटा खराब झाल्या आहेत. हा आकडा गेल्यावर्षीपेक्षा 300 पट अधिक आहे. करोनाच्या भीतीने लोकांनी नोटा सॅनिटाइझ करण्यास, त्या धुवून वाळवण्यास सुरुवात केली. काही बँकांमध्ये देखील नोटांच्या बंडलावर सॅनिटायझर स्प्रे केला जात आहे. यामुळे जुन्या नोटांबरोबरच यावर्षीच्या नव्या नोटा देखील खराब होत आहेत. गेल्यावर्षी 2000 च्या 6 लाख नोटा खराब झाल्या होत्या, यावर्षी हा आकडा 17 कोटींहून अधिक आहे. 500 च्या नोटा 10 टक्क्याने अधिक खराब झाल्या आहेत. दोनशेच्या गेल्या वर्षीच्या तुलनेत 300 टक्के अधिक खराब झाल्या आहेत. 20 च्या नोटा एका वर्षात 20 टक्क्याहून अधिक खराब झाली आहे. Corona’s effect

2017-18 मध्ये आरबीआयकडे 2 हजाराच्या एक लाख नोटा आल्या होत्या. 2018-19 मध्ये ही संख्या वाढून 6 लाख झाली होती. यावर्षी या आकडेवारीने सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. वर्ष 2019-20 मध्ये आरबीआयकडे 2 हजाराच्या 17.68 कोटी नोटा आल्या. याप्रमाणे 500 च्या नोटा 2017-18 मध्ये 1 लाख, 2018-19 मध्ये 1.54 कोटी तर 2019-20 मध्ये 16.45 कोटी इतक्या आरबीआयकडे आल्या आहेत. दरवर्षी आरबीआयकडे 10, 20 आणि 50 च्या नोटा सर्वाधिक येतात.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com