करोनावरील लस 2021 पर्यंत अशक्य

संसदीय समितीच्या बैठकीत खुलासा
करोनावरील लस 2021 पर्यंत अशक्य

नवी दिल्ली | new delhi - जगभरातील अनेक देशांमध्ये करोनावरील उपचारासाठी लस संशोधनाचे काम सुरू आहे. भारतातही 15 ऑगस्टपर्यंत करोना लस लाँच करण्यात येईल असे सांगण्यात येत आहे. मात्र करोनाची लस 2021 आधी उपलब्ध करून देणे कठीण असल्याचे संसदीय समितीने सांगितले आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार जयराम रमेश यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संसदीय समितीच्या बैठकीत या संदर्भात खुलासा करण्यात आला. करोना आणि इतर साथीच्या आजारांशी भविष्यातील व्यवहार करण्याची तयारी या बैठकीचा अजेंडा होता. ही लस सर्वत्र उपलब्ध होण्यासाठी 2021 साल उजाडेल असाही कयास आहे.

विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाशी संबंधित संसदीय समितीच्या अधिकार्‍यांनी यासंदर्भात माहिती दिली. या वर्षात करोनाची लस तयार करून ती सर्वत्र उपलब्ध करणे शक्य नाही, 2021 च्या सुरुवातीला ही लस उपलब्ध होऊ शकेल असेही अधिकार्‍यांनी सांगितले.

दरम्यान करोनाच्या संकटात साडेतीन महिन्यानंतर शुक्रवारी संसदेच्या स्थायी समितीची बैठक झाली. या बैठकीमध्ये भारतात सुरू असलेल्या करोनाच्या लसीच्या निर्मितीसंदर्भात चर्चा करण्यात आली. 15 ऑगस्टपर्यंत कोव्हॅक्सीन नावाची करोनाची लस येऊ शकते असे सांगण्यात येत आहे. या लसीच्या मानवी चाचणीसाठी परवानगी देण्यात आली होती. 7 जुलैला मानवी चाचणी करण्यात आली. त्यामुळे ही लस 15 ऑगस्टपर्यंत बाजारात उपलब्ध होते का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com