Corona updates : देशात १२५ दिवसानंतर सर्वात कमी रुग्णसंख्येची नोंद; सक्रिय रुग्णांची संख्या चार लाखांपेक्षा कमी
Corona Update

Corona updates : देशात १२५ दिवसानंतर सर्वात कमी रुग्णसंख्येची नोंद; सक्रिय रुग्णांची संख्या चार लाखांपेक्षा कमी

दिल्ली | Delhi

देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेना (Corona second wave) देशात हाहाकार माजवला होता. करोना रुग्णसंख्येने (Covid19 Patient) मोठा उच्चांक गाठला होता. दरम्यान देशातील नव्या करोना रुग्णांची संख्या घटत असल्याने करोनाची दुसरी लाट आता बर्‍यापैकी नियंत्रणात आली आहे. आज आढळून आलेल्या नवीन करोनाबाधितांचा हा आकडा गेल्या १२५ दिवसांत सर्वात कमी आहे.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या २४ तासांत ३० हजार ०९३ नवे करोना रुग्ण आढळले असून ३७४ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आतापर्यंत करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ४ लाख १४ हजार ४८२ वर पोहोचली आहे. तसेच देशात गेल्या २४ तासात ४५ हजार २५४ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. या संख्येसह करोनावर मात करणाऱ्यांची संख्या ०३ कोटी ०३ लाख ५३ हजार ७१० वर पोहचली आहे.

मात्र देशातील करोना रुग्णसंख्येत होणारी घट पाहता नागरिक काहीसे निर्धास्त झाले आहे. त्यामुळे पर्यटन स्थळी होणारी गर्दी, करोना नियमांचे उल्लंघन अशा अनेक घटना समोर आल्या. मात्र कोविड-19 (Covid-19) संकट अद्याप पूर्णपणे टळलेले नाही. करोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. त्यात नागरिकांचा हलगर्जीपणा यामुळे धोका अधिक वाढू शकतो. अशा परिस्थितीत केंद्र सरकारने पुढील १२५ दिवस महत्त्वाचे असल्याचे म्हटले आहे. तसंच सतर्क राहण्याचा इशाराही दिला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com