Corona Update : देशात लसीकरणाचा आकडा ९० कोटी पार, वाचा काय आहे करोनाची सध्याची परिस्थिती?

महाराष्ट्रातील स्थिती? (Corona update maharashtra)
Corona Update : देशात लसीकरणाचा आकडा ९० कोटी पार, वाचा काय आहे करोनाची सध्याची परिस्थिती?

दिल्ली | Delhi

भारतात करोनाच्या दुसऱ्या लाटेना (Corona second wave) देशात हाहाकार माजवला होता. करोना रुग्णसंख्येने (Covid19 Patient) मोठा उच्चांक गाठला होता. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून देशात करोनाच्या (COVID19) आकडेवारीत चढ-उतार दिसत आहे.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासात देशात करोनाचे (New corona patient today) २२ हजार ८४२ नवे रुग्ण आढळले आहेत. तर २४४ जणांचा करोनामुळे मृत्यू (COVID19 death) झाला आहे. आतापर्यंत देशात एकूण ३ कोटी ३८ लाख १३ हजार ९०३ जणांना करोनाची लागण (Corona total patient) झाली आहे.

तसेच देशात सध्या २ लाख ७० हजार ५५७ सक्रीय रुग्ण (Corona active cases) आहेत. दरम्यान गेल्या २४ तासांमध्ये २५ हजार ९३० जणांनी करोनावर मात केली असून आतापर्यंत ३ कोटी ३० लाख ९४ हजार ५२९ जण करोनामुक्त झाले आहे. तर करोनामुळे ४ लाख ४७ हजार ७५१ जणांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान गेल्या २४ तासात आढळलेल्या २२ हजार ८४२ रुग्ण आणि २४४ मृत्यूंपैकी एकट्या केरळमध्ये १३ हजार २१७ रुग्ण आणि १२१ मृत्यूंची नोंद आहे.

लसीकरणाचा आकडा ९० कोटी पार (corona vaccination update india)

देशात सुरु असलेल्या लसीकरण मोहिमेने वेग पकडला असून गेल्या २४ तासांमध्ये एकूण ७३ लाख ७६ हजार ८४६ नागरिकांना लस देण्यात आली आहे. तर आतापर्यंत एकूण ९० कोटी ५१ लाख ७५ हजार ३४८ जणांचं लसीकरण झालं असून लवकरच ही संख्या १०० कोटींच्या जवळ पोहोचण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रातील स्थिती? (Corona update maharashtra)

करोनाच्या रुग्णसंख्येचा आलेख राज्यातही खाली येताना पहायला मिळत असून करोनाबाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत घट पाहायला मिळत आहे. राज्यात काल दिवसभरात ३ हजार ६२ रुग्ण बरे होऊन घरी परतले असून एकूण ६३ लाख ७७ हजार ९५४ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९७.२७ टक्के एवढे झाले आहे.

तसेच काल राज्यात २ हजार ६९६ नवीन रुग्णांचे निदान झाले.आता राज्यातील करोना बाधितांची एकूण संख्या ६५ लाख ५६ हजार ६५७ झाली आहे. तर काल दिवसभरात ४९ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. तर, राज्यात एकूण १ लाख ३९ हजार १९६ करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के एवढा आहे

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com