Corona Update: देशात दैनंदिन रुग्णसंख्येत थोड्याप्रमाणात घट, मृतांची संख्याही हजाराच्या आत
Corona Update

Corona Update: देशात दैनंदिन रुग्णसंख्येत थोड्याप्रमाणात घट, मृतांची संख्याही हजाराच्या आत

महाराष्ट्रातील स्थिती काय?

दिल्ली | Delhi

देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेना (Corona second wave) देशात हाहाकार माजवला होता. करोना रुग्णसंख्येने (Covid19 Patient) मोठा उच्चांक गाठला होता.

दरम्यान देशातील नव्या करोना रुग्णांची संख्या घटत असल्याने करोनाची दुसरी लाट आता बर्‍यापैकी नियंत्रणात आली आहे. मागील काही दिवसांपासून देशातील कोरोनाच्या नवीन रुग्णांची संख्या कमी-जास्त होत आहे. ३५ हजारांखाली आलेली नवीन कोरोना रुग्णसंख्या पुन्हा ४५ हजारांच्या पुढे गेली होती. आता यामध्ये पुन्हा एकदा थोड्याप्रमाणात घट पाहायला मिळत आहे.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या २४ तासांत ४१ हजार ५०६ नवे करोना रुग्ण (New Covid19 Patient) आढळले असून ८९५ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत करोनामुळे मृत्यू (Covid19 death) झालेल्यांची संख्या ४ लाख ०८ हजार ०४० वर पोहोचली आहे.

तसेच देशात गेल्या २४ तासात ४१ हजार ५२६ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. या संख्येसह करोनावर मात करणाऱ्यांची संख्या २ कोटी ९९ लाख ७५ हजार ०६४ वर पोहचली आहे.

महाराष्ट्रातील स्थिती काय? (Maharashtra corona update)

राज्यातील करोना संसर्गाचा वेग कमी जरी झालेला असला, तरी देखील अद्यापही दररोज करोनाबाधित आढळून येत आहेत. शिवाय, करोनाबाधित रूग्णांच्या मृत्यू संख्येतही भर पडतच आहे.

राज्यात काल दिवसभरात ८ हजार २९६ नवीन करोनाबाधित आढळून आले असून, ६ हजार २६ रूग्ण करोनातून बरे झाले आहेत. तर, १७९ करोनाबाधित रूग्णांचा आज मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. राज्यात कालपर्यंत एकूण ५९ लाख ०६ हजार ४६६ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) ९६.०५ टक्के एवढे झाले आहे. तर, सध्या राज्यातील मृत्यूदर २.०४ टक्के एवढा आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com