Corona Update : देशात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९७.८९ टक्क्यांवर, आज किती नवे रुग्ण?

महाराष्ट्रातील स्थिती? (Corona update maharashtra)
Corona Update : देशात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९७.८९ टक्क्यांवर, आज किती नवे रुग्ण?

दिल्ली | Delhi

भारतात करोनाच्या दुसऱ्या लाटेना (Corona second wave) देशात हाहाकार माजवला होता. करोना रुग्णसंख्येने (Covid19 Patient) मोठा उच्चांक गाठला होता.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून देशात करोनाच्या (COVID19) आकडेवारीत चढ-उतार दिसत आहे. दरम्यान दिलासादायक बाब म्हणजे देशातील सक्रिय रुग्णसंख्या घटली असून ती ०.७८ टक्के इतकी कमी झाली आहे. तसेच रुग्ण बरे होण्याचं प्रमाणही गेल्या दीड वर्षातील सर्वाधिक म्हणजे ९७.८९ इतकं झालं आहे.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासात देशात करोनाचे (New corona patient today) २० हजार ७९९ नवे रुग्ण आढळले आहेत. तर, २६ हजार ७१८ जणांनी करोनावर मात केली आहे.

तसेच १८० जणांचा करोनामुळे मृत्यू (COVID19 death) झाला आहे. तसेच देशात सध्या २ लाख ६४ हजार ४५८ सक्रीय रुग्ण (Corona active cases) आहेत. तर ३ कोटी ३१ लाख २१ हजार २४७ जणांनी आतापर्यंत करोनावर मात केली आहे. तर करोनामुळे ४ लाख ४८ हजार ९९७ जणांचा मृत्यू झाला आहे.

महाराष्ट्रातील स्थिती? (Corona update maharashtra)

महाराष्ट्रात काल दिवसभरात २ हजार ७१६ रूग्ण करोनामधून बरे झाले असून, २ हजार ६९२ नवीन करोनाबाधित आढळून आले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण ६३ लाख ८० हजार ६७० करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

Related Stories

No stories found.