Corona Update : देशात नव्या करोनाबाधितांमध्ये पुन्हा वाढ, महाराष्ट्रातील स्थिती काय?

देशात आतापर्यंत किती जणांचं लसीकरण?
Corona Update : देशात नव्या करोनाबाधितांमध्ये पुन्हा वाढ, महाराष्ट्रातील स्थिती काय?
करोना अपडेट

दिल्ली | Delhi

देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेना (Corona second wave) देशात हाहाकार माजवला होता. करोना रुग्णसंख्येने (Covid19 Patient) मोठा उच्चांक गाठला होता. दरम्यान देशातील नव्या करोना रुग्णांची संख्या घटत असल्याने करोनाची दुसरी लाट आता बर्‍यापैकी नियंत्रणात आली आहे. मात्र देशात गेल्या २४ तासात करोनाबाधितांचा आकडा पुन्हा एकदा वाढल्याने देशाची चिंता वाढली आहे.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या २४ तासांत ४१ हजार १५७ नवे करोना रुग्ण आढळले असून ५१८ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आतापर्यंत करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ४ लाख १३ हजार ६०९ वर पोहोचली आहे. तसेच देशात गेल्या २४ तासात ४२ हजार ००७ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. या संख्येसह करोनावर मात करणाऱ्यांची संख्या ०३ कोटी ०२ लाख ६९ हजार ७९६ वर पोहचली आहे. तसेच देशात सध्या ४ लाख २२ हजार ६६० रुग्णांवर उपचार आहेत.

देशाचा रिकव्हरी रेट वाढून ९७.३१ टक्के झाला आहे. तर एकूण सक्रिय रुग्ण १.३६ टक्के आहेत. आढवड्याचा पॉझिटिव्ही रेट ५ टक्क्यांची खाली नोंदला जात आहे. देशात सुरु असलेल्या लसीकरण मोहिमेदरम्यान आतापर्यंत ४० कोटी ४९ लाख ३१ हजार ७१५ लोकांना करोना प्रतिबंधक लशीचा किमान एक डोस देण्यात आला आहे.

दरम्यान देशातील करोना रुग्णसंख्येत होणारी घट पाहता नागरिक काहीसे निर्धास्त झाले आहे. त्यामुळे पर्यटन स्थळी होणारी गर्दी, करोना नियमांचे उल्लंघन अशा अनेक घटना समोर आल्या. मात्र कोविड-19 (Covid-19) संकट अद्याप पूर्णपणे टळलेले नाही. करोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. त्यात नागरिकांचा हलगर्जीपणा यामुळे धोका अधिक वाढू शकतो. अशा परिस्थितीत केंद्र सरकारने पुढील १२५ दिवस महत्त्वाचे असल्याचे म्हटले आहे. तसंच सतर्क राहण्याचा इशाराही दिला आहे.

महाराष्ट्रातील स्थिती काय? (Maharashtra corona update)

राज्यातील करोना संसर्गाचे प्रमाण काहीस कमी होताना दिसत आहे. मात्र असे जरी असले तरी देखील अद्यपाही करोनाबाधित आढळून येत असून, करोनाबाधित रूग्णांच्या मृत्यू संख्येत रोज भर पडतच आहे. तर दुसरीकडे करोनातून बरे होणाऱ्यांची संख्या देखील वाढत आहे. काल दिवसभरात राज्यात ८ हजार ९५० रूग्ण करोनातून बरे झाले असून, ८ हजार १७२ नवीन करोनाबाधित आढळून आले आहेत. याशिवाय राज्यात आज १२४ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. राज्यात दररोज आढळणाऱ्या करोनाबाधितांची संख्या ही करोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येपेक्षा कधी कमी तर कधी जास्त आढळून येत आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com