COVID19 : दिलासादायक! देशात गेल्या ११८ दिवसांमधील निच्चांकी रूग्णवाढ

महाराष्ट्र तिसऱ्या लाटेच्या दिशेनं?
COVID19 : दिलासादायक! देशात गेल्या ११८ दिवसांमधील निच्चांकी रूग्णवाढ
Corona

दिल्ली | Delhi

देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेना (Corona second wave) देशात हाहाकार माजवला होता. करोना रुग्णसंख्येने (Covid19 Patient) मोठा उच्चांक गाठला होता. दरम्यान देशातील नव्या करोना रुग्णांची संख्या घटत असल्याने करोनाची दुसरी लाट आता बर्‍यापैकी नियंत्रणात आली आहे. देशात काल दिवसभरात गेल्या ११८ दिवसांमधले सर्वात कमी बाधित आढळले तर उपचाराधीन रुग्णांची संख्याही गेल्या १०९ दिवसांमधली सर्वात कमी आहे.

Corona
धक्कादायक! कोविड रुग्णालयाला भीषण आग; ५२ रुग्णांचा होरपळून मृत्यू

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी देशात ३१ हजार ४४३ नवीन करोना रुग्ण (New Covid19 Patient) आढळले आहेत. याच कालावधीत ४९ हजार ००७ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. देशातील सक्रिय रुग्णाची संख्या ४ लाख ३१ हजार ३१५ इतकी झाली आहे. भारताचा रिकव्हरी रेट (Recovery rate) ९७.२८ टक्के इतका झाला आहे.

देशाचा आठवड्याचा आणि दिवसाचा पॉझिटिव्हिटी रेट (Positivity rate) पाच टक्केंपेक्षा कमी आहे. भारताचा आठवड्याचा पॉझिटिव्हिटी रेट २.२८ टक्के इतका आहे. तर दिवसाचा पॉझिटिव्हिटी रेट १.८१ टक्के इतका आहे. मागील २२ दिवसांपासून भारताचा दिवसाचा पॉझिटिव्हिटी रेट तीन टक्केंपेक्षा कमी आहे.

देशात सुरु असलेल्या लसीकरण मोहिमेदरम्यान काल दिवसभरात ४० लाख ६५ हजार ८६२ नागरिकांनी करोना प्रतिबंधक लस टोचून घेतली. त्यापैकी २५ लाख ५८ हजार ८४५ नागरिकांनी पहिला डोस घेतला तर १५ लाख ७ हजार १७ नागरिकांनी करोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस घेतला. त्यामुळे लस घेतलेल्या नागरिकांची संख्या आता ३८ कोटी १४ लाख ६७ हजार ६४६ झाली आहे.

Corona
Petrol Disel Price : आज पेट्रोल-डिझेलचे दर 'जैसे थे'!, जाणून घ्या आजचे दर

महाराष्ट्र तिसऱ्या लाटेच्या दिशेनं?

महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून दैनंदिन करोनाबाधित रुग्णांची संख्या दहा हजारांच्या आत येऊ लागली आहे. मात्र महाराष्ट्रात जुलै महिन्याच्या पहिल्या अकरा दिवसांमध्ये करोनाचे ८८ हजार १३० रुग्ण आढळून आले. ह्या आकडेवारीमुळे आता तज्ज्ञांकडून करोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका व्यक्त कऱण्यात येत आहे. करोनारुग्णांच्या संख्येत झालेली ही वाढ करोनाच्या तिसऱ्या लाटेची सुरुवात असू शकते, असंही तज्ज्ञांचं म्हणणं आहे. महाराष्ट्रात आलेल्या करोनाच्या आधीच्या दोन लाटांप्रमाणेच ह्याही लाटेचं स्वरुप आता दिसून येत आहे.

काल दिवसभरात महाराष्ट्रात ७,६०३ नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर १५ हजार २७७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत ५९ लाख २७ हजार ७५६ रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.१५ टक्के आहे. काल राज्यात ५३ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर २.०४ टक्के झाला आहे. तब्बल ४८ महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्यांमध्ये काल एकही मृत्यूची नोंद झालेली नाही. सध्या राज्यात १ लाख ८ हजार ३४३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com