Corona Update : देशात वेगाने पसरतोय 'करोना' ; गेल्या २४ तासात आढळले १७ हजाराहून अधिक रुग्ण

Corona Update : देशात वेगाने पसरतोय 'करोना' ; गेल्या २४ तासात आढळले १७ हजाराहून अधिक रुग्ण

दिल्ली | Delhi

करोनाच्या (coronavirus) तिसऱ्या लाटेतून सावरत व्यवहार पूर्वपदावर आले असतानाच देशात करोना संसर्ग पुन्हा चिंता वाढवत आहे. आज देशात १७ हजाराहून अधिक नोंद झाली आहे. (corona new cases)

देशात गेल्या २४ तासांत १७ हजार ३३६ नवीन करोना रुग्ण (Corona Patient) आढळले आहेत, तर १३ जणांचा मृत्यू झाला आहे. नवीन मृत्यूंसह देशातील मृतांची संख्या ५ लाख २४ हजार ९५४ इतकी झाली आहे.

सध्या देशातील सक्रीय करोना रुग्णांची संख्या ८८ हजार २८४ इतकी झाली आहे. (Corona update) दरम्यान काल देशात १३ हजार ०२९ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. देशात आतापर्यंत ४ कोटी २७ लाख ४९ हजार ०५६ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com