चिंता वाढली! भारतात करोनाबाधितांचा आकडा पुन्हा १० हजारांच्या पार; Omicron चाही कहर

चिंता वाढली! भारतात करोनाबाधितांचा आकडा पुन्हा १० हजारांच्या पार;  Omicron चाही कहर

दिल्ली | Delhi

जगभरात करोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटने (Omicron variant) चिंता वाढवली असतानाच आता भारतातही दैनंदिन करोना बाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ (Coronavirus cases in India) होताना दिसत आहे.

चिंता वाढली! भारतात करोनाबाधितांचा आकडा पुन्हा १० हजारांच्या पार;  Omicron चाही कहर
नव्या वर्षात WhatsApp मध्ये येणार नवे फीचर्स, जाणून घ्या...

देशात गेल्या २४ तासांमध्ये १३ हजार १५४ नवीन करोनाबाधित आढळले आहेत. तर, २६८ बाधितांचा मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत एकूण ३ कोटी ४८ लाख २२ हजार लोकांना करोनाची लागण झाली आहे. त्यापैकी ४ लाख ८० हजार ८६० जणांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत ३ कोटी ४२ लाख ५८ हजार बाधित करोनामुक्त झाले आहेत. तर देशातील कोरोना सक्रिय रुग्णांची संख्या ८२ हजार ४०२ वर पोहोचली आहे.

चिंता वाढली! भारतात करोनाबाधितांचा आकडा पुन्हा १० हजारांच्या पार;  Omicron चाही कहर
विशाल निकम ठरला Bigg Boss Marathi 3 चा विजेता, जाणून त्याच्याविषयी...

देशात लसिकरण मोहीम वेगाने सुरु आहे. आतापर्यंत १४३ कोटी ८३ लाख २२ हजार ७४२ जणांनी लसीचे डोस घेतले आहेत. काल दिवसभरात ६३ लाख ९१ हजार २८२ डोस देण्यात आले असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

Omicron चाही कहर

तसेच भारतात ओमिक्रॉन व्हेरिएंटचा कहर पाहण्यास मिळतो आहे. भारतात ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या (Omicron) रुग्णांची संख्या ९६१ वर पोहोचली आहे. यात सर्वाधिक दिल्लीत २६३ तर महाराष्ट्रात २५२ रुग्ण सापडले आहे.

चिंता वाढली! भारतात करोनाबाधितांचा आकडा पुन्हा १० हजारांच्या पार;  Omicron चाही कहर
सोशल मीडियावर सनी लिओनीच्या अटकेची का होतेय मागणी?

महाराष्ट्रातील ओमिक्रॉनचे कुठे, किती रुग्ण?

मुंबई - १३७

पिंपरी चिंचवड -२५

पुणे ग्रामीण - १८

पुणे मनपा - ११

ठाणे मनपा - ८

नवी मुंबई, पनवेल, कल्याण डोंबिवली, प्रत्येकी - ७

नागपूर - ६

सातारा, उस्मानाबाद प्रत्येकी - ५

वसई विरार - ३

औरंगाबाद, नांदेड, बुलढाणा, भिवंडी निजामपूर मनपा प्रत्येकी - २

लातूर, अहमदनगर, अकोला, मीरा भाईंदर, कोल्हापूर प्रत्येकी - १

चिंता वाढली! भारतात करोनाबाधितांचा आकडा पुन्हा १० हजारांच्या पार;  Omicron चाही कहर
मुंबईत राहूनही मराठी येत नाही?; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने कपिल शर्माला झापलं

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com